एक्स्प्लोर
परिणीती चोप्राच्या सासरी कोण-कोण असतं? कशी आहे सासू-सासऱ्यांची लाईफस्टाईल? जाणून घ्या राघव चड्ढाच्या एकूणच कुटुंबाविषयी
Raghav Chadha Family Details: परिणीती चोप्रा-राघव चढ्ढा यांच्या शाही लग्नाची सर्वत्र चर्चा आहे. उदयपूरमध्ये 24 सप्टेंबरला लग्न सोहळा रंगणार आहे, दरम्यान कार्यक्रमस्थळी पाहुण्यांचं आगमन सुरू झालं आहे.
Parineeti Chopra and Raghav Chadha wedding
1/8

परिणीती लवकरच मिसेस राघव चड्डा बनण्याआधी तिच्या सासरची ओळख करून घेऊया.परिणीतीचे होणारे सासू-सासरे कोण आहेत? आणि तिच्या घरी कोण-कोण राहतं? या विषयी जाणून घेऊया.
2/8

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा हे पंजाबी कुटुंबातील आहेत. चड्ढा कुटुंबीय दिल्लीत राहतात, त्यांच्या कुटुंबात राघव चड्डा यांच्या आई-वडिलांशिवाय त्याची धाकटी बहीणही आहे.
3/8

राघवची धाकटी बहीण व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट आहे.
4/8

राघव यांनी दिल्लीतील मॉर्डन स्कूलमधून शिक्षण घेतलं आहे. ते अभ्यासात अतिशय हुशार होते, त्यांना शाळेत असताना डिबेट करायला खूप आवडायचं. त्यांनी पुढे दिल्ली विश्नविद्यालयातून कॉलेज पूर्ण केलं आहे.
5/8

राघव चड्ढांच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल बोलायचं झालं तर, 2011 मध्ये जेव्हा अण्णा हजारेंचं 'भ्रष्टाचारविरुद्ध भारत' आंदोलन सुरू होतं, त्यावेळीच राघव चड्ढा परदेशातून शिक्षण घेऊन भारतात परतले होते. त्यावेळी त्यांची भेट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी झाली.
6/8

राजकारणात उतरण्याआधी राघव चड्ढा चार्टर्ड अकाऊंटंट होते.
7/8

यानंतर राघव चड्ढांनी राजकारणात प्रवेश केली. जेव्हा 2012 मध्ये आम आदमी पार्टी पक्षाची स्थापना झाली, त्यावेळी 24 वर्षीय राघव चड्ढा पक्षाच्या वतीने टेलिव्हिजन डिबेटमध्ये सहभागी व्हायचे.
8/8

आता लवकरच खासदार राघव चड्ढा हे अभिनेत्री परिणीती चोप्रासोबत लग्नबंधनात अडकणार आहेत.
Published at : 23 Sep 2023 09:07 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























