एक्स्प्लोर
Multibagger Stock : 11 रुपयांचा स्टॉक पाच वर्षात 290 रुपयांवर, मल्टीबॅगर स्टॉकनं दिला 2323 टक्के परतावा, गुंतवणूकदार मालामाल
Stock Market News : अपोलो मायक्रो सिस्टीम्सनं शेअर धारकांना गेल्या पाच वर्षात 2323 टक्के परतावा दिलेला आहे. हा स्टॉक पाच वर्षांपूर्वी 11 रुपयांवर होता.
मल्टीबॅगर स्टॉक
1/6

अपोलो मायक्रो सिस्टीम्स या शेअरनं गुंतवणूकदारांना गेल्या पाच वर्षात दमदार रिटर्न दिले आहेत. गुंतवणूकदारांना या स्टॉकनं गेल्य पाच वर्षात 2323 टक्के परतावा दिला आहे.
2/6

अपोलो मायक्रो सिस्टीम्स चा शेअर 5 वर्षांपूर्वी 11 रुपयांवर होता. आता या कंपनीचा शेअर 290 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच पाच वर्षांपूर्वी या कंपनीच्या स्टॉकमध्ये ज्यांनी 1 लाख रुपये गुंतवले असतील त्याचं मूल्य आता 24 लाख रुपये झालं असतं.
3/6

या कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना या स्टॉकनं गेल्या वर्षभरात 172 टक्के परतावा दिला आहे.
4/6

आज अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीच्या स्टॉकमध्ये 275.25 रुपयांवर ट्रेडिंग सुरु झालं. त्यानंतर शेअरमध्ये तेजी आल्यानंतर स्टॉक 290.80 रुपयांच्या स्तरावर पोहोचला आहे. या कंपनीचं बाजारमूल्य 9240 कोटी रुपये झालं आहे.
5/6

अपोलो मायक्रो सिस्टीम्स ही संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या तंत्रज्ञानावर काम करते. ही कंपनी अंडर वॉटर मिसाइल प्रोग्रॅम्स, पाणबुडी यंत्रणा, एवियोनिक सिस्टीम्स त्याच्याशी संबंधित प्रोजेक्टच्या डिझाईन, डिस्ट्रीब्यूशन आणि डेव्हलपमेंटची कामं करते.
6/6

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 09 Sep 2025 08:27 PM (IST)
आणखी पाहा























