एक्स्प्लोर
आयटीआर भरताना 'या' पाच चुका टाळा, अन्यथा थेट अर्ज होऊ शकतो बाद!
31 जुलै 2024 ही आयटीआर भरण्याची शेवटची तारीख आहे. त्याआधी आयटीआर भरणे गरजेचे असून योग्य ती काळजी घ्यायला हवी. तसे न केल्यास तुमचा अर्ज बाद होऊ शकतो.

itr (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/8

ITR filing deadline: विवरणपत्र म्हणजेच आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. यानंतर आयटीआर भरायचा असेल तर तुम्हाला विलंब शुल्क द्यावे लागेल.
2/8

आयटीआर भरताना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. अर्ज भरताना चूक झाल्यास तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. त्यामुळेच आयटीआर भरताना खालील पाच चुका करणे टाळणे पाहिजे.
3/8

सर्वप्रथम आयटीआर भरताना चुकीची आणि अर्धवट माहिती भरू नका. तसे केल्यास तुमचा आयटीआर फॉर्म रद्द होऊ शकतो. तसेच तुम्हाला दंड लागू शकतो.
4/8

आयटीआरमध्ये घोषित करण्यात आलेले उत्पन्न आणि फॉर्म 16 वर असलेले उत्पन्न यात तफावत असेल तर आयटीआर फॉर्म रद्द होतो. त्यामुळे ही चुक टाळायला हवी.
5/8

आयटीआर फॉर्म हा वेळेवर भरायला हवा. मुदतीच्या अगोदर फॉर्म न भरल्यास तुमचा अर्ज रद्दबातल होऊ शकतो. विशेष म्हणजे त्यामुळे तुम्हाला दंडदेखील भरावा लागू शकतो.
6/8

करपात्र उत्पन्नाच्या मोजणीत चुक झाल्यास तुमचा आयटीआर फॉर्म रद्द होऊ शकतो. त्यामुळे करपात्र उत्पन्न किती आहे, याची निट मोजणी करावी.
7/8

आयटीआर जमा केल्यानंतर तुम्ही ई-व्हेरिफिकेशन न केल्यास तुमचा आयटीआर फॉर्म रद्द होऊ शकतो. त्यामुळे ही चुकदेखील टाळायला हवी.
8/8

image 8
Published at : 30 Jul 2024 02:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
