एक्स्प्लोर
नऊ महिने नवा स्टॉक! पैसे गुंतवल्यास मिळणार जबरदस्त रिटर्न्स? जाणून घ्या टार्गेट काय? खरेदी कधी करावा?
आगामी नऊ महिन्यात हा शेअर आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याची शक्यता आहे. तसे मत एचडीएफसी सेक्युरिटीज या ब्रोकरेज फर्मने व्यक्त केले आहे.
Va Tech Wabag share price best stocks to invest (फोटो सौजन्य- META AI)
1/6

Small cap Stock to buy : एचडीएफसी सेक्युरिटीज (HDFC Securities) या ब्रोकरेज फर्मने वाटेक वाबाग (Va Tech Wabag) या कंपनीत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आगामी तीन ते सहा महिन्यांसाठी गुंतवणूक केल्यास हा शेअर चांगला परतावा देऊ शकतो, असा दावा एचडीएफसी सेक्युरिटीजने केला आहे.
2/6

वाटेक वाबाग या कंपनीचा शेअर तीन ते सहा महिन्यांत साधारण 28 ते 30 टक्क्यांनी वाढू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या एका महिन्यात या शेअरचे मूल्य साधारण 250 टक्क्यांनी वाढले आहे.
3/6

HDFC Securities ने सांगितल्यानुसार वाटेक वाबाग या कंपनीत गुंतवणूक करायची असल्यास टार्गेट प्राईज 2190 रुपये ठेवावी. 21 ऑक्टोबर रोजी या शेअरचे मूल्य 1708 रुपये होते. आगामी 6-9 महिन्यांत हा शेअर 28 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो असे एचडीएफसी सिक्योरिटीज या ब्रोकरेज फर्मला वाटते.
4/6

या स्टॉकमध्ये गुंतवणूक करत असाल तर 1852-1890 रुपयांच्या रेंजमध्ये तो खरेदी करता येऊ शकते. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करता या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना एका वर्षात 250 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. सोबतच 2024 साली आतापर्यंत हा शेअर 150 टक्क्यांनी वाढला आहे.
5/6

गेल्या सहा महिन्यात हा शेअर 60 टक्क्यांनी वाढला आहे. तर तीन महिन्यांत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.
6/6

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 22 Oct 2024 02:53 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
बातम्या
करमणूक
महाराष्ट्र























