एक्स्प्लोर
कांदा निर्यातबंदी! दरात मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. निर्यातबंदीनंतर कांद्याच्या दरात घसरण झाली आहे.
Fall in onion prices
1/9

सध्या कांद्याच्या (Onion) मुद्यावरुन राज्यातील वातावारण चांगलचं तापलं आहे. कारण केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion Export Ban) घातली आहे.
2/9

सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयानंतर कांद्याच्या दरात घट झाली आहे.
3/9

कांदा निर्यातबंदीमुळं कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. यामुळं सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे शेतकऱ्यांन या निर्णयाचा मोठा फटका बसत आहे.
4/9

केंद्र सरकारनं सरकारने 7 डिसेंबर रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. यानंतर घाऊक बाजारात कांद्याचे भाव जवळपास 50 टक्क्यांनी घसरले आहेत
5/9

खरीप कांद्याचा पुरवठा वाढल्यानं येत्या आठवडाभरात भाव स्थिर राहण्याची किंवा किंचित घट होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
6/9

एपीएमसीच्या आकडेवारीनुसार, लासलगाव एएमपीसीमध्ये कांद्याची सरासरी घाऊक किंमत 20 ते 21 रुपये प्रति किलो आहे.
7/9

निर्यातबंदीच्या आधी कांदा 39 ते 40 रुपये प्रति किलो होता. सध्या कांदा 20 ते 21 रुपयांवर गेला आहे.
8/9

सरकारनं कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत.
9/9

निर्यातबंदीनंतर सरासरी किंमत 47 टक्क्यांनी कमी झाली आहे. तर सर्वोच्च किंमत 44 टक्क्यांनी कमी झाली आहे.
Published at : 20 Dec 2023 02:17 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई






















