एक्स्प्लोर

यवतमाळ जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री संजय देशमुख शिवसेनेच्या वाटेवर! मंत्री संजय राठोडांना शह देण्यासाठी सेना नेतृत्वाची रणनिती

लवकरच संजय देशमुख 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधण्याची शक्यता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंतांची घेतली भेट

यवतमाळ :  यवतमाळ जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री आणि दिग्रसचे माजी आमदार संजय देशमुख शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यांनी काल रविवारी अकोल्यात शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांची गुप्त भेट घेतली. याआधी मुंबईला त्यांनी 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. काल खासदार अरविंद सावंतांसोबत प्रवेशासंदर्भात अंतिम बोलणी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या भेटीवेळी बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख, शिवसेनेचे जेष्ठ नेते विजय मालोकार, अकोला जिल्हाप्रमुख गोपाल दातकर उपस्थित होते. आता लवकरच संजय देशमुख 'मातोश्री'वर शिवबंधन बांधत सेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिग्रसचे माजी आमदार राहिलेल्या संजय देशमुख यांना सेनेत घेत शिंदे गटात गेलेल्या संजय राठोडांना शह देण्याचा प्रयत्न सेना नेतृत्वाचा प्रयत्न आहे. संजय देशमुखांची यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, यवतमाळ आणि आर्णी मतदारसंघात मोठी ताकद आहे. 

कोण आहेत संजय देशमुख? (Sanjay Deshmukh)

  •  1998 मध्ये शिवसेनेतून राजकीय कारकिर्द सुरू. संजय राठोडांसोबत होते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख. 
  • मात्र, 1999 च्या विधानसभा निवडणुकीवेळी बंडखोरी करीत त्यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला होता
  • संजय देशमुख हे मंत्री संजय राठोड यांचे कट्टर विरोधक आहेत. 
  • संजय देशमुख हे 1999 आणि 2004 मध्ये दिग्रस विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजयी झाले होते
  • 2009 मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेत दारव्हा आणि दिग्रस मतदारसंघ एक झाला होताय. या निवडणुकीत तत्कालिन दारव्हा मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांनी नव्या दिग्रसमधून लढत संजय देशमुखांचा पराभव केला होता
  •  2019 च्या विधानसभा निवडणुकीत संजय देशमुखांनी संजय राठोडांच्या विरोधात अपक्ष लढत 75 हजार मतदान घेतलं होतं
  •   देशमुख शिवसेनेत आल्यास दिग्रस विधानसभेसह यवतमाळ लोकसभेसाठी ठरू शकतात सक्षम उमेदवार.
  • संजय राठोडांना शह देण्यासाठी सेना नेतृत्वाची 'खेळी' 

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मतदारसंघाचं राजकारण 1999 पासून कायम दोन 'संजय'भोवती फिरत आहे. यातील एक 'संजय' म्हणजे 'संजय राठोड'. तर दुसरे 'संजय देशमुख. दोघांचीही कारकिर्द सुरू झाली शिवसेनेतून. दोघंही कधीकाळचे कट्टर मित्र. मात्र, आता एकदम कट्टर 'राजकीय शत्रू'. दिग्रसचे आमदार असलेल्या संजय राठोड यांनी शिंदे गटात प्रवेश करीत शिवसेनेशी बंडखोरी केली. संजय राठोडांचं बंड पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या फारच जिव्हारी लागल्याचं बोललं जात आहे. यातूनच संजय राठोडांना राजकीय धडा शिकविण्यासाठी सेना नेतृत्वानं आता पावलं टाकायला सुरूवात केली आहे. यातील सेनेचा पहिला 'मोहरा' हे संजय देशमुख असण्याची शक्यता आहे. यातूनच उद्धव ठाकरेंनी आता थेट संजय देशमुखांना शिवसेनेत घेत संजय राठोडांना जेरीस आणण्याची रणनिती आखली आहे. 

यवतमाळ जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री संजय देशमुख शिवसेनेच्या वाटेवर! मंत्री संजय राठोडांना शह देण्यासाठी सेना नेतृत्वाची रणनिती

 संजय देशमुखांनी 1999 ते 2009 असं तब्बल 10 वर्ष दिग्रस मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे. विशेष म्हणजे दोन्हीवेळी त्यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. मात्र, 2009 मध्ये संजय राठोड यांच्याकडून पराभवानंतर संजय देशमुख मतदारसंघाच्या राजकारणात काहीसे 'बॅकफूट'वर आल्याचं चित्र होतं. मात्र, दिग्रसमधील नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ अशा ठिकाणी प्रत्येकदा देशमुखांनी आपली ताकद सिद्ध केली आहे. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत संजय देशमुखांनी संजय राठोडांच्या विरोधात अपक्ष लढत 75 हजार मतदान घेतलं होतं. संजय देशमुखांच्या याच ताकदीला आता बळ देण्याचा विचार सेना नेतृत्वाने केला आहे. यासंदर्भात संजय देशमुखांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार अरविंद सावंतांशी प्रवेशासंदर्भात चर्चा झाली आहे. आता लवकरच संजय देशमुख 'मातोश्री'वर शिवबंधन बांधत सेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. 

संजय देशमुखांचा सेना, अपक्ष, काँग्रेस, भाजप, अपक्ष असा राजकीय प्रवास

संजय देशमुखांचा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरू झाला. 1998 मध्ये त्यांचा दिग्रस तालुक्यातील सिंगद-मांडवा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवारीवर पराभव झाला. पुढे 1999 मध्ये ते शिवसेनेचे यवतमाळ जिल्हाप्रमुख झालेत. मात्र, विधानसभेचं तिकीट नाकारल्याने त्यांनी अपक्ष उभे राहत बंडखोरी केली. अन चमत्कार घडवत फक्त 125 मतांनी राष्ट्रवादीच्या ख्वाजा बेग यांचा पराभव केला. यावेळी विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे मंत्रीमंडळात ते युवक आणि क्रीडा खात्याचे राज्यमंत्री बनलेत. 2004 मध्येही ते अपक्ष म्हणून विधानसभेवर निवडून आलेत. 2009 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर पुनर्रचित दिग्रसमधून निवडणूक लढविली. मात्र, संजय राठोडांकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. 2019 च्या लोकसभेपुर्वी त्यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला. मात्र, सेनेशी युतीमूळे तिकीट न मिळाल्याने त्यांनी संजय राठोडांविरोधात अपक्ष म्हणून बंडखोरी करीत तब्बल 75 हजार मतं घेतलीत. 

  संजय देशमुखांची यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, यवतमाळ आणि आर्णी मतदारसंघात मोठी ताकद आहे. देशमुखांनी शिवसेनेत प्रवेश केला तर यवतमाळ जिल्ह्यात त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Kamble on Walmik Karad : वाल्मिक कराडचे इन्काउंटर करा, अशोक कांबळेंची खळबळजनक मागणीWalmik Karad Car Pune : 'या' कारमधून वाल्मिक कराड पुणे CID कार्यालयात शरणABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 31 December 2024Sandeep Kshirsagar Full PC : दोषी नाही तर फरार का झालात? संदीप क्षीरसागरांचा कराडला सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
RBI Rule : नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय, कारण समोर
नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
'उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा' ब्रीदवाक्यासह 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा जानेवारीत रंगणार
जानेवारीत रंगणार 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, रंगकर्मींकडून जय्यत तयारी सुरु
Gold : कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
Embed widget