एक्स्प्लोर

Yavatmal Rain : यवतमाळमधील नेर तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, जमिनी गेल्या खरवडून; शेती पिकांचं मोठं नुकसान

Yavatmal Rain : यवतमाळ जिल्ह्यात काही भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. या पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे.

Yavatmal Rain : यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसानं (Yavatmal Heavy rain) हजेरी लावली आहे. तर काही भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. या पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला आहे. या पावसामुळं पिकं पूर्णतः उध्वस्त झाली असून, अनेक ठिकाणी जमिनी खरवडून गेल्या आहेत. 

गेल्या तीस वर्षात इतका पाऊस गावात पडला नव्हता, एवढा पाऊस झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. शेतकऱ्यांनी जमिनीत स्वप्न पेरले होते. मात्र तो साखर झोपेत असतानाच त्याचे हे स्वप्न या पावसाने पुरते वाहून नेले. ज्या मातीच्या आधारे हे स्वप्न वर येते त्या मातीसहित या स्वप्नांचा चिखल झाला. शेतात उरले फक्त दगड अन् खड्डे. मुसळधार कोसळलेल्या पावसानं सावरगाव, गोळेगाव , ब्राह्मनवाडा, शिरजगाव, पांढरी, पिंपळगाव काळे शिवारातील जवळपास 114 हेक्टर जमिनीवरील पिके पूर्णतः उध्वस्त झाल्याचा अंदाज आहे. एका पावसाने शेतकरी उघड्यावर पडले आहेत. 

जमिनी गेल्या खरवडून, शेतातील पिकं गेली वाया

पावसामुळे अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली आहे. ती दुरुस्त करण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. मागच्या वर्षीची  अतिवृष्टी, नापिकी यातून सावरत नाही तोच यावर्षी मुसळधार पाऊस दारावर आला. सावरगाव येथील शेतकरी प्रवीण भोयर यांच्या चार भावांच्या कुटुंबात 28 एकर शेती आहे. यातील जवळपास वीस एकर शेतातील उभे पीक उध्वस्त झाले आहे. त्यांच्या शेतातील जवळपास चार एकर जमीन पार खरडून गेली आहे. प्रमोद यांनी दोन वेळा कपाशीची लागवड केली होती. त्यात या पावसाने त्यांचे पूर्ण स्वप्न उध्वस्त झाले आहे.

कर्ज काढून केली होती लागवड

साखळी नदीला जोडणारा नाला फुटल्याने त्याचे पाणी शेतात शिरले आहे. पाहता पाहता सारे पीक वाहून गेले आहे. यात या शेतकऱ्यांचे बी, बियाणे, खते, मजुरी असे लाखो रुपयांचे नुकसान तर झालेच पण माती खरडून गेल्याने जमीन पडीक पडणार आहे. या पावसाचा जोरदार फटका येथील  शेतकऱ्यांना बसला आहे. शेतातील पीक गेलं, पावसाने मातीही नेली खरडून, आधीच कर्ज काढून लागवड केली होती. आता बियाणे घ्यायला पैसे आणायचे कुठून अन् पेरायला मातीच नाही तर पेरायचे काय? असा  प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मुलाचे शिक्षण, मुलीचे लग्न, औषधोपचार कसा करायचा? असंख्य प्रश्नांची मालिका या पावसाने शेतकऱ्यांपुढे उभी केली आहे.आता हे सर्व शेतकरी मदतीसाठी प्रशासनाकडे आस लावून बसले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Rain : पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाच अंदाज 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
Embed widget