एक्स्प्लोर
North Korea : उत्तर कोरियात आहे लाल लिपस्टिकवर बंदी, कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की उत्तर कोरियात लाल लिपस्टिक लावल्यास कठोर शिक्षा होते.हा विचित्र देश इथे बंदी घातलेल्या गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असतो!
फॅशन आणि सौंदर्याच्या दृष्टीने सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे लाल लिपस्टिक. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की उत्तर कोरियात ती लावल्यास कठोर शिक्षा होते. होय, हा विचित्र देश इथे बंदी घातलेल्या गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असतो. या देशातील हुकूमशहा शासकाला लाल लिपस्टिकचा का तिरस्कार आहे हे या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.(Photo Credit : pexels)
1/7

उत्तर कोरिया हा असा देश आहे जिथे लोकांना आपल्या राज्यकर्त्यांनी बनवलेल्या नियमांचे पालन करावे लागते. खरं तर इथल्या हुकुमशाही राज्यकर्त्याने फॅशनशी संबंधित अनेक नियम बनवले आहेत, जे न पाळल्याबद्दल लोकांना कठोर शिक्षा भोगावी लागते. या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, जगभरात ज्या लाल लिपस्टिकला खूप पसंती मिळते, त्यावर या देशाने बंदी का घातली आहे. चला जाणून घेऊया.(Photo Credit : pexels)
2/7

उत्तर कोरियात महिलांना लाल लिपस्टिक लावता येत नाही, कारण या देशात त्यावर बंदी आहे. या देशात फॅशनशी संबंधित अनेक विचित्र नियम आहेत. लाल लिपस्टिकवर बंदी घालण्याचे कारण म्हणजे येथील हुकूमशहा राज्यकर्ते हा रंग भांडवलशाही आणि व्यक्तिवादाशी जोडू पाहतात.(Photo Credit : pexels)
Published at : 08 May 2024 11:57 AM (IST)
आणखी पाहा























