(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या मनात भाजपसोबत जाण्याची इच्छा होती , 'माझा व्हिजन'मध्ये सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
Sunil Tatkare: 2019 साली जो जनतेने दिलेला कौल मानला गेला असता तर राज्यात एवढी स्थित्यंतर झाली नसती असे सुनील तटकरे म्हणाले
मुंबई : महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) भाजपसोबत जायचं होतं, असा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी केला आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन (Majha Maharashtra Majha Vision) या कार्यक्रमात तटकरे बोलत होते. 2021 मध्ये उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाणांनी मोदींची विकासकामांबाबत भेट घेतली होती. त्या भेटीनंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत जाण्यासाठी इच्छुक होते असं तटकरेंनी सांगितलं.
महाविकास आघाडीचे सरकार असताना 2021 साली दिल्लीतल्या भेटीनंतर मुंबईत ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. त्या बैठकीत संजय राऊतांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून आल्यापासून उद्धव ठाकरेंच्या मनात या सरकारबद्दल पुनर्विचार सुरू आहे, असा गौप्यस्फोट सुनील तटकरेंनी केला आहे.
2021 साली ग्रँड हयातमध्ये काय घडले?
सुनील तटकरे म्हणाले, 2021 साली तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी जेव्हा दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत विकासकामांसंदर्भात चर्चा करण्यासाठी गेले होते. तिथून परत आल्यावर संजय राऊतांचे मला पाच ते सहा वेळा फोन आले आणि त्यांनी अजितदादांना भेटीसाठी वेळ मागितली होती. त्यानुसार हॉटेल ग्रँड हयातमध्ये पहिल्यांदा आम्ही भेटलो पण तेव्हा अजितदादा सोबत नव्हते. दुसऱ्यांदा मी अजितदादांना घेऊन परत तिथे मीटिंग करता गेले तेव्हा तिथे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत उपस्थित होते.त्यावेळी संजय राऊतांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून आल्यापासून उद्धव ठाकरेंच्या मनात या सरकारबद्दल पुनर्विचार सुरू आहे. त्यांना वाटतं आहे की हे सरकार मोडावं आणि भाजपसोबत जावे.
2019 चा जनतेचा कौल मानला असता तर राज्यात स्थित्यंतर झाली नसती : सुनील तटकरे
2019 साली जो जनतेने दिलेला कौल मानला गेला असता तर राज्यात एवढी स्थित्यंतर झाली नसती असे सुनील तटकरे म्हणाले. राज्यात जी स्थित्यंतर आली त्याला उद्धव ठाकरे जबाबदार आहे का? यावर बोलताना तटकरे म्हणाले, मी कोणाचेही नाव घेणार नाही. पण महाराष्ट्रातील जनतेचा स्पष्टपणे कौल त्यावेळी होता.
2019 ते 2024 मध्ये घडलेले राजकारण हे महाराष्ट्रासाठी पूर्णपणे नवीन: सुनील तटकरे
2019 ते 2024 मध्ये घडलेले राजकारण हे महाराष्ट्रासाठी पूर्णपणे नवीन आहे. याची सुरुवात महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हापासून झाली आहे, असेही सुनील तटकरे म्हणाले.
Sunil Tatkare Video: