कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
अवाढव्य होर्डिंग कोसळल्याने (Ghatkopar Hoarding Collapsd) आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेलेल्या एका 24 वर्षीय तरुणावर काळाने घाला घातला. भरत राठोड असे या तरुणाचे नाव आहे.
मुंबई : अचानक आलेल्या पावसाचा मोठा (Mumbai Unseasonal Rain) तडाखा बसला. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची मोठी तारंबळ उडाली होती. वादळी वाऱ्यामुळे एक अवाढव्य होर्डिंग कोसळल्याने (Ghatkopar Hoarding Collapsd) आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेलेल्या एका 24 वर्षीय तरुणावर काळाने घाला घातला. भरत राठोड असे या तरुणाचे नाव आहे.
भरत राठोड असे मेडिकलमध्ये डीलिव्हरीचं काम करायचा. पेट्रोल भरण्यासाठी म्हणून तो पेट्रोल पंपावर गेला होता. त्याचवेळी होर्डिंग कोसळून त्याचा मृत्यू झाला. भरत राठोड घाटकोपर वेस्टमधील गोळीबार रोड परिसरातील रहिवासी आहे. कामासाठी भरत सकाळी घराबाहेर गेला होता तो परतलाच नाही. भरत हा कुटुंबात एकटाच कमावणारा व्यक्ती आहे. त्याला छोटा भाऊ आहे. आठवडाभरापूर्वीच वडिलांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना राजवाडी रुग्णालयात दाखल केले होते. दोनच दिवसापूर्वी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. भरतच्या निधनाने आधार हरपल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे.
काळ आला होता पण वेळ नाही....
पावसामुळे पती घरी कधी येणार याकडे लक्ष लागले होते. तेवढ्यात पतीचा फोन आला मला वाचवा, मी अडकलो आहे. पतीच्या फोननंतर पत्नीने आणि मुलांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. तब्बल चार तासाच्या थरारानंतर पतीला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. काळ आला होता पण वेळ नाही असेच काहीसे अशोक गुप्तांच्या बाबतीत घडले आहे. अशोक गुप्ता हे नेहमीप्रमाणे घरी जाण्याअगोदर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेले. पेट्रोल भरुन पैसे देणार तोच त्यांच्या अंगावर महाकाय होर्डिंग कोसळला. काय झाले हे त्यांना कळलेच नाही. होर्डिंग पडल्याने एक हात अडकला होता तर एक हात रिकामा होता. लगेच पत्नीला फोन केला आणि मदत मागितली. त्यानंतर काही वेळाने मदतीसाठी आवाज आला. मी आतून आवाज दिला, पण माझा आवाज जात नव्हता. मग मी मोबाईलच्या टॉर्चची लाईट दाखवली.त्यानंतर माझी शुद्ध हरपली,मग मला रुग्णालयातच जाग आल्याते अशोक गुप्ता म्हणाले.
बचावकार्य सुरूच
घाटकोपरच्या घटनेची पालिका प्रशासन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक (NDRF) यांना देखील पाचारण करण्यात आले असून पुढील बचावकार्य सुरू असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.
भरतच्या निधनाने आधार हरपला..