Ghatkoper Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, भावेश भिंडेसोबतचा फोटो ट्विट
Maharashtra Politics: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणात उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप. किरीट सोमय्या आणि राम कदम यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य अजूनही सुरु आहे.
मुंबई: घाटकोपर परिसरात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. घाटकोपरच्या या दुर्घटनेनंतर (Ghatkoper Hoarding Accident) नेहमीप्रमाणे प्रशासकीय यंत्रणांनी एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडायला सुरुवात केली आहे. परंतु, या वादात आता भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी उडी घेत या दुर्घटनेप्रकरणी थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. राम कदम यांनी उद्धव ठाकरे आणि भावेश भिंडे यांचा फोटो ट्विट केला आहे. भावेश भिडे (Bhavesh Bhide) हाच पेट्रोल पंपाचा मालक आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. भाजप नेते राम कदम आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiaya) यांनी या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
राम कदम यांनी भिडे आणि उद्धव ठाकरेंचा फोटो ट्विट करत म्हटले आहे की, 14 लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिंडे. श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या घरात. हे मनाला चीड आणणारे चित्र आहे. त्या अनधिकृत होर्डिंगला कोणाचे संरक्षण होते, हे या चित्रावरून स्पष्ट होते. टक्केवारी सठी कोविड काळातले खिचडी चोर, कफनचोर... आजही टक्केवारी साठी 14 लोकांचे नाहक बळी घेत आहेत. कुठे फेडणार हे पाप?, असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे.
तर किरीट सोमय्या यांनीही या अनधिकृत होर्डिंगला उद्धव ठाकरे यांचे संरक्षण असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास उच्चस्तरीय एसआयटीच्या माध्यमातून व्हावा. या होर्डिंगला 1 जानेवारी 2020 ते 1 मार्च 2022 पर्यंत परवानगी आहे. शहाजी निकम यांनी ही परवानगी दिली होती. 40 फुटाची परवानगी असताना 120 फुटाचे होर्डिंग लावण्यात आले. याबाबत पोलिसांकडे हरकती नोंदवल्या, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. भावेश हा आपल्या परिवारासोबत पळून गेला आहे. त्याला पोलिसांनी फरार घोषित करावे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.
14 लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिडे.. श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या घरात..
— Ram Kadam ( modi ka parivar ) (@ramkadam) May 14, 2024
मनाला चीड आणणारे हे चित्र..
त्या अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कोणाचे होते
हे या चित्रावरून स्पष्ट होते..
टक्केवारी साठी कोविड काळातले खिचडी चोर.. कफनचोर..
आजही टक्केवारी साठी 14… pic.twitter.com/5OGtWxh2Pp
मुंबई महानगरपालिकेचा भ्रष्टाचार, 400 अनधिकृत होर्डिंग
हा प्लॉट राज्य पोलिसांना घरांसाठी देण्यात आला होता पण या ठिकाणी 40000 फूट जागा निधी चौधरी आणि पालिका आयुक्त यांनी ही जागा एका संस्थेला दिली. हे सर्व 2020-21 मध्ये करण्यात आले. 30 जानेवारी 2020 ला पेट्रोल पंप आरक्षण देण्यात आले. त्यानंतर या ठिकाणी पेट्रोलपंप उभारण्याची परवानगी दिली. उद्धव ठाकरे सरकारने हा पेट्रोल पंप बेनामी कंपनीला चालवण्यासाठी दिला होता, असा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला.
या पेट्रोल पंपाच्या आसपासची झाडे मारण्यात आली आणि तोडण्यात आली. मी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी असे बेकायदेशीर होर्डिंग काढायला सांगितले. 2020-22 असे बेकायदेशीर 400 होर्डिंग लावण्यात आले. हे होर्डिंग तात्काळ काढावेत. पालिकेचा भ्रष्टाचार खूप वाढला आहे. अनेक वेळा तक्रारी करून दुर्लक्ष झालं आहे, असे सोमय्या यांनी म्हटले. पालिकेने परवानगी द्यायला हवी होती पण ती आउट ऑफ द बॉक्स जाऊन राज्य सरकारने दिलीय. 16 लाख भाड्यापैकी काही भाग हा पोलीस कल्याण निधीला जायचा, असेही किरीट सोमय्या यांनी सांगितले.
आणखी वाचा