एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Afghanistan : कोण आहे तालिबानचा म्होरक्या मुल्ला बरादर? अफगाणिस्तानच्या भावी राष्ट्राध्यक्षपदासाठी नाव चर्चेत

Taliban : अफगाणिस्तानमध्ये 1994 साली ज्या चार लोकांनी तालिबानची स्थापना केली त्यापैकी एक नाव म्हणजे मुल्ला अब्दुल गनी बरादर. तो सध्या तालिबानच्या राजकीय कार्यालयाचा प्रमुख आहे.

काबुल : तालिबान या दहशतवादी संघटनेनं अफगाणिस्तानवर संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित केलं असून त्यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन होणार हे आता स्पष्ट झालं आहे. राष्ट्रपती अशरफ घनी यांनी आता सत्तेचं शांततेच्या मार्गाने हस्तांतरण करण्याची तयारी केली असून तालिबानच्या कोणत्या नेत्याकडे सत्तेची कमान जाते याकडे सर्वांचं लक्ष आहे. अशात तालिबानचा म्होरक्या मुल्ला अब्दुल घनी बरादार याचं नाव सर्वांत पुढं येत आहे. राष्ट्रपती पदासाठी त्याच्या नावाची लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. 

कोण आहे मुल्ला अब्दुल गनी बरादर? 
अफगाणिस्तानमध्ये 1994 साली ज्या चार लोकांनी तालिबानची स्थापना केली त्यापैकी एक नाव म्हणजे मुल्ला अब्दुल गनी बरादर. तो सध्या तालिबानच्या राजकीय कार्यालयाचा प्रमुख आहे. तसेच तालिबानच्या शांती वार्ता पथकाचा प्रमुख सदस्य आहे.

Afghanistan : राष्ट्रपती अशरफ घनी सत्ता सोडणार; तालिबानचा कमांडर मुल्लाह अब्दुल घनी बरादार बनणार राष्ट्राध्यक्ष 

मुल्ला बरादर यांने 1980 च्या दशकात सोव्हिएत रशियाच्या सैन्याच्या विरोधात अफगाणिस्तानमध्ये जिहाद पुकारला होता. 1992 साली, रशियन सैन्याच्या माघारीनंतर देशाचे नेतृत्व कोण करणार यावर गृहयुद्ध सुरु झालं. त्यावेळी मुल्ला बरादर यांने आपला नातेवाईक मुल्ला उमर याच्या मदतीने कंदहारमध्ये एक मदरसा स्थापन केला. नंतरच्या काळात 1996 साली तालिबानने अफगाणिस्तानचे सरकार उलथवून आपली सत्ता स्थापन केली. 

अटक आणि सुटका
अमेरिकेतील 9/11 च्या घटनेनंतर या प्रदेशातील सगळी समिकरणं बदलली. सन 2001 साली अमेरिका आणि नाटोचे सैन्य अफगाणिस्तानमध्ये आले आणि त्यांनी तालिबानला सत्तेतून बाजूला सारलं. त्यावेळी अमेरिकन सैन्याच्या विरोधात मोठं बंड झालं, त्याचं नेतृत्व मुल्ला बरादर याने केलं होतं. सन 2010 साली अमेरिका आणि पाकिस्तानच्या एका संयुक्त कारवाईत मुल्ला बरादर याला कराचीतून अटक करण्यात आली होती. 

Afghanistan : 25 वर्षापूर्वीचा काळा इतिहास; तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींची निर्घृणपणे हत्या करुन मृतदेह खांबावर लटकवला

सन 2012 पर्यंत मुल्ला बरादर याच्याबद्दल जास्त काही माहिती नव्हती. 2013 साली अफगाणिस्तान सरकारने देशातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तालिबानशी शांती वार्ता सुरु केली. त्यामध्ये ज्या प्रमुख कैद्यांना सोडण्यात आलं त्यामध्ये मुल्ला बरादर याचा समावेश होता. सप्टेंबर 2013 साली पाकिस्तानने त्याला सोडून दिलं. त्यानंतर तो कुठे गेला याची नेमकी माहिती कुणालाच नाही. 

तालिबानचा सर्वोच्च नेता आणि मुल्ला मोहम्मद उमर याचा सर्वात विश्वासू व्यक्ती म्हणून मुल्ला अब्दुल गनी बरादर याचं नाव घेतलं जायचं. असं सांगण्यात येतंय की मुल्ला बरादरची बहिण ही मुल्ला उमर याची पत्नी होती आणि मुल्ला उमरची बहिण ही मुल्ला बरादरची पत्नी होती. मुल्ला बरादरची पत्नी ही तालिबानच्या सगळ्या आर्थिक व्यवहारांचा हिशोब ठेवायची. सन 2018 साली अमेरिकेशी चर्चा करण्यासाठी कतारमध्ये तालिबानने आपलं कार्यालय सुरु केलं. त्यावेळी मुल्ला अब्दुल गनी बरादरला राजकीय कार्यालयाचा प्रमुख म्हणून घोषित करण्यात आलं. 

Afghanistan : जगात चिंतेचे वातावरण असताना चीनचा तालिबानकडे मैत्रीचा हात

अमेरिकेशी चर्चा करण्याचा समर्थक
ज्यावेळी अमेरिकेने तालिबानची सत्ता उलथवून लावली त्यावेली मुल्ला अब्दुल गनी बरादर हा तालिबान सरकारचा उप संरक्षण मंत्री होता. मुल्ला अब्दुल गनी बरादर हा अमेरिकेशी तालिबानने चर्चा करावी या गोष्टीचा समर्थक होता. संयुक्त राष्ट्राने त्याच्यावर बंदी घातली होती. 

तब्बल वीस वर्षाच्या युद्धानंतर अमेरिका आणि नाटोचे सैन्य अफगाणिस्तानमधून माघारी गेल्यानंतर काहीच अवधीत तालिबानी दहशतवादी संघटनेनं या देशावर कब्जा मिळवला आहे. तालिबानने आपल्याला सत्तेचं हस्तातरण हे शांततेच्या मार्गाने व्हावं अशी मागणी राष्ट्रपती अशरफ घणी यांच्याकडे केली आहे. अशरफ घणी यांच्याकडे आता काहीच पर्याय नसून त्यांनीही आपली सत्ता सोडण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे लवकरच तालिबानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तामध्ये सरकार अस्तित्वात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

Afghanistan : अपहरणाची भीती, संपत आलेले इंधन आणि हवेत 12 चकरा; एअर इंडियाच्या 'त्या' विमानाचा थरार

पहा व्हिडीओ :  Taliban Cabinet : असं असेल तालिबानचं मंत्रिमंडळ, तालिबानी कशी हाताळणार अफगाणिस्तानची सत्ता?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

6000 कोटींच्या गैरव्यवहाराचं प्रकरण, जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यात ईडीची दिरंगाई, सुप्रीम कोर्टाने आरोपीला जामीन देऊन टाकला
एकदा मुदतवाढ दिली, दुसऱ्यांदा दोन दिवसांचा वेळ मागितला, सुप्रीम कोर्टानं ईडीची मागणी फेटाळली, आरोपीला जामीन
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tufan Alaya : ...जेव्हा गावातले 17 शेतकरी गट एकत्र येतात !Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMaharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणारMaharashtra Oath Ceremony : 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी - सूत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
6000 कोटींच्या गैरव्यवहाराचं प्रकरण, जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यात ईडीची दिरंगाई, सुप्रीम कोर्टाने आरोपीला जामीन देऊन टाकला
एकदा मुदतवाढ दिली, दुसऱ्यांदा दोन दिवसांचा वेळ मागितला, सुप्रीम कोर्टानं ईडीची मागणी फेटाळली, आरोपीला जामीन
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
IND vs PM XI Warm-Up Match : टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट
टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
Embed widget