Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Raj Thackeray and Uddhav Thackeray BMC Election Manifesto: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज रविवारी ठाकरे बंधूंनी 'शब्द ठाकरेंचा' हा वचननामा प्रसिद्ध केला. यामध्ये मुंबईकरांच्या आयुष्यावर मोठा परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.पाळणाघरे,पाळीव प्राणी, पाणी आणि सांडपाणी,रस्ते,कचरा व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, रोजगार यासह अनेक गोष्टी आहे, हा वचननामा या महानगरपालिका निवडणुकीमध्ये गेमचेंजर ठरणार का अशी चर्चा सध्या सुरू आहे. नेमकं काय आहे ठाकरेंच्या वचननामामध्ये - मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा, शब्द ठाकरेंचा! - मुंबईची प्रगती, मुंबईकरांचा स्वाभिमान - मुंबईची जमीन मुंबईकरांच्या घरांसाठीच - महापालिकेच्या मालकीच्या जमिनी खासगी विकासकांच्या घशात न घालता तिव्ये मुंबईकरांची सेवा करणा-या शासकीय, महापालिका, बेस्ट आणि पोलीस कर्मचाऱ्यांना तसंच गिरणी कामगारांना हक्काची घरे देणार. - मुंबई महापालिकेचं स्वतःचं गृहनिर्माण प्राधिकरण असेल. - पुढील ५ वर्षांत १ लाख मुंबईकरांना परवडणारी हक्काची घरं दिली जातील. मुंबईकरांचा स्वाभिमान - घरकाम करणा-या महिलांची नोंदणी करणार आणि नोंदणीकृत महिलांना दर महिन्याला रू.१,५०० स्वाभिमान निधी देणार. - कोळी मच्छीमार महिला विक्रेत्यांची नोंदणी करून त्यांना अर्थसाह्य आणि नवीन परवान्यांची तरतूद-ज्यात समुदायांतर्गत परवान्यांच्या हस्तांतरणाची सोय समाविष्ट असेल. - कष्टकरी मुंबईकरांसाठी फक्त १० रुपयांत नाश्ता आणि दुपारचं जेवण देणारी मासाहेब किचन्स सुरू करणार. - मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर दर २ किलोमीटरला एक अशी महिलांसाठी उत्तम स्वच्छता असलेली शौचालयं बांधणार. या स्वच्छतागृहात महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन पेंड व्हेंडिंग मशिन्स असतील. लहान मुलांचे डायपर्स बदलण्याची सोय असेल. पाळणाघरे - नोकरदार पालक तसंच कष्टकरी महिला यांच्या लहानग्यांना सांभाळणारी पाळणाघरे सुरू करणार पाळीव प्राणी - मुंबईच्या प्रत्येक विभागात पाळीव प्राण्यांसाठी पेट पार्क, पेट क्लिनिक, पेट क्रेश, पेट एम्ब्यूलन्स, पेट क्रेमॅटोरियम यांची सोय उपलब्ध करून देणार. वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्वयं-रोजगार अर्थसाह्य योजना - एक लाख तरुण-तरूणींना प्रत्येकी २५ हजार ते १ लाख रुपयांचा स्वयंरोजगार सहाय्यता निधी आणि २५ हजार गिग वर्कर्सना आणि डबेवाल्यांना ई-बाईकसाठी बिनव्याजी कर्ज देणार. रोजगार - मुंबई महापालिकेतील अत्यावश्यक रिक्त पदं भरणार - महापालिकेच्या मोठ्या प्रकल्पांमध्ये इंजिनिअरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ऑन-साइट अॅप्रेंटिसशीप देऊन मराठी तरूण-तरूणींना कामाचा अनुभव देणार. - मुंबईत रोजगारासाठी येऊ इच्छिणाऱ्या मराठी तरुण-तरुणींसाठी वसतिगृह उभारणार. - महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डात यूपीएससी आणि एमपीएसीच्या विद्यार्थ्यांसाठी सी. डी. देशमुख प्रशिक्षण केंद्र सुरु करणार. मैदाने - छत्रपती शिवाजी महाराज पार्कसारखी चांगली मैदानं, उद्यानं उभी केली जातील. जिथे नागरिकांना बसण्यासाठी कट्टे असतील. ती मैदानं भिंतींनी झाकली जाणार नाहीत. - ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असतील तसंच प्रत्येक वार्डात एक - आजोबा-आजी उद्यान असेल. करमुक्ती व कर सवलत - ७०० चौ. फुटांपर्यतच्या घरांवरील मालमत्ता कर माफ - ५०० चौ. फुटापर्यंतच्या सर्व सदनिकांवरील मालमत्ता कर माफ केल्यामुळे तब्बल १४ लाख मुंबईकर फ्लॅटधारकांचे प्रतिवर्षी किमान रु. ५,००० ते कमाल रु. १५,००० वाचले. आता ५०० चौ. फुटांवरील व ७०० चौ. - फुटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर माफ करणार. - सोसायट्यांना १ लाख रूपयांची सबसिडी - कचरा विलगीकरण, गांडुळ खत प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टींग, सोलर एनर्जी तसेब सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या सोसायट्यांना मालमत्ता करात सवलत देणार. - या प्रक्रियेसाठी आवश्यक सुविधा उभारण्यासाठी सोसायट्यांना प्रोत्साहनपर एक लाख रुपयांची सबसिडी देणार - पर्यावरणस्नेही सोसायट्यांच्या पुनर्विकासासाठी बोनस एफएसआय पर्यावरणस्नेही सोसायट्यांच्या पुनर्विकासासाठी त्यांना अतिरिक्त चटईक्षेत्र देणार. - कचरा संकलनासाठी प्रस्तावित कर रद्द करणार. शिक्षण - महापालिकेच्या शाळा कदापी बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही. - दहावीनंतरची गळती रोखण्यासाठी महापालिका शाळा इमारतीत बारावीपर्यंतचे ज्युनिअर कॉलेज सुरू करणार. - मुंबई महापालिकेच्या शाळांचा संपूर्ण कायापालट करण्यात शिवसेनेला गेल्या १० वर्षांमध्ये यश आलेलं आहे. ज्या शाळांकडे पाहून काही लोक नाके मुरडत होते, त्या महापालिका शाळांचा उंचावलेला - शैक्षणिक दर्जा, दहावीचा उत्तम निकाल आणि एसएससी बोर्ड, आयसीएसई बोर्ड, सीबीएसई बोर्ड, आयबी बोर्ड आदी अभ्यासक्रमांमुळे पालिका शाळांमध्ये प्रवेश घ्यायला अक्षरशः रांगा लागत आहेत. - मुंबईतल्या महागड्या, खासगी शाळांप्रमाणेच मुंबई महापालिकेच्या पब्लिक स्कूल्स' या आता उत्तम, गुणवत्तापूर्ण, अत्याधुनिक शिक्षणासाठी ओळखल्या जातात, - प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची मातृभाषा, राजभाषा मराठी आणि जागतिक भाषा इंग्रजी यायलाय हवी हा - आमचा आग्रह आहे. मुंबई महापालिका ही देशातील एकमेव महापालिका असेल जी मराठी, हिंदी गुजराती, उर्दू, तेलगू, तामिळ, कन्नड आणि इंग्रजी या आठ माध्यमांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मोफत उपलब्ध करून देते. - शिक्षण अनुभव सहज, सुंदर आणि प्रभावी व्हावा यासाठी इयत्ता आठयीपुढील प्रत्येक विद्यार्थ्यांला टॅब देणार - प्रत्येक शाळेत व्हर्चुअल आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी तसंच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचावापर करून विद्यार्थ्यांना नव्या जगातील - - नव्या शैक्षणिक आव्हानांसाठी सज्ज करणार - शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा फिटनेस आणि पोषक (शाकाहारी व मांसाहारी-अंग्रे) आहारावरही विशेष लक्ष देणार. - महापालिकेच्या सर्व माध्यमांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी 'बोलतो मराठी' हा हसत-खेळत मराठी शिकवणारा डिजिटल उपक्रम सुरु करणार. - मुंबई महापालिकेची वाचनालयं ही अत्याधुनिक आणि डिजिटल केली जातील. आणि प्रत्येक - वाचनालयात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका असेल स्मशानभूमी - हिंदू स्मशानभूमी, मुस्लीम व ख्रिश्चन दफनभूमी तसंच इतर धर्मीयांच्या स्मशानभूमीत शाश्वत आणि आवश्यक त्या इम्प्रूव्हमेंट व विकास करणार मुंबईची अनुभूती - मुंबईचं 'मुंबईपण' अधोरेखित करण्यासाठी एस्थेटिक सेन्स पाळला जाईल आणि मुंबईच कॅरेक्टर जपलं जाईल. - मुंबई महापालिकेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने या देशातील सर्वात मोठं ग्रंथालय उभारलं जाईल. - छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाचे नूतनीकरण करणार - देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मुंबई आणि महाराष्ट्राचे योगदान अधोरेखित करणारे स्वातंत्र्यसमर स्मृतीदालन उभारणार - सात बेटं ते देशाची आर्थिक राजधानी हा गेल्या तीनशे साडेतीनशे वर्षातील मुंबईच्या प्रगतीचा ऐतिहासिक आढावा, कापड गिरण्या ते आयटी हब हा प्रवास तसंच मुंबईला घडवण्यात मोलाचा वाटा असलेल्या उद्योजकांच्या योगदानाचे दर्शन घडवणारे अत्याधुनिक मुंबई म्युझियम उभारणार - स्व. बाळासाहेबांच्या नावाने मुंबईत एक कला महाविद्यालय सुरु केलं जाईल. जिये उपयोजित कला, फाईन आर्ट्स, सिनेमा तंत्र यांचं शिक्षण मिळेल - मुंबई महापालिका २०३१ पर्यंत १० नवीन मध्यम व छोट्या आकाराची नाट्घगृहं व कलादालने उभारेल. मुंबईसाठीची आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा - मुंबई महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि कंट्रोल रूम यांचे आधुनिकीकरण करून प्रत्येक - प्रशासकीय विभागासाठी जलद दले (रॅपिड फ्लीट) सज्ज ठेवणार. - मुंबईतल्या उंचच उंच इमारती आणि झोपडपट्टी परीसरातील आव्हाने लक्षात घेऊन अग्निशमन दलाचे - आधुनिकीकरण करणार प्रत्येक वॉर्डात मिनी फायर ब्रिगेड आणि फायर फायटिंग मोटरसायकल्स उपलब्ध असतील. - डॅझमेंट रिस्पॉन्स वेहिकल आणि ऑल टेरेन ऑल पर्पज वेहिकल उपलब्ध करणार. आरोग्य - प्राथमिक आरोग्य सेवाच नव्हेत, तर सर्व प्रकारच्या, अगदी अत्याधुनिक वैद्यकीय सेवा पुरवता याव्यात यासाठी आधीपासूनच अस्तित्वात असलेली तीन वैद्यकीय महाविद्यालये आणि सर्वसाधारण रूग्णालये यांनंतर विलेपार्ले येथील कूपर रुग्णालय येथे बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. - दीड कोटी लोकसंख्येच्या मुंबईतील रूग्णांचा भार समर्थपणे पेलण्यासाठी आणि आरोग्य सेवांचा विस्तार करण्यासाठी मुंबईत आणखी पाच वैद्यकीय महाविद्यालयं (शताब्दी-गोवंडी, शताब्दी-कांदिवली, एम.टी. अग्रवाल-मुलुंड, भगवती- बोरिवली, राजावाडी-घाटकोपर येथे) सुरू करणार. - पालिका रूग्णालयांतील ओपीडी क्षमता दुप्पट करणार - महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे रोबोटिक ऑपरेशन थिएटर तसंच डिजिटल सब्स्ट्रॅक्शन एंजिओग्राफी / जलद रिकव्हरीसाठी लॅप्रोस्कोपी सर्जरी सुरु करणार. - शताब्दी (कांदिवली), एमटी अग्रवाल (मुलुंड) देणार नाही आणि शताब्दी (गोवंडी) रुग्णालयांचे खासगीकरण होऊ - केंद्र व राज्य सरकार मान्यताप्राप्त जेनेरिक मेडिसिन दुकानांमध्ये पालिका रुग्णालयातील तसंच - दवाखान्यातील डॉक्टरांनी प्रीस्क्रिप्शन दिलेल्या रुग्णांना जेनेरिक औषधे मोफत उपलब्ध करुन देणार. - ज्येष्ठ नागरिकांसाठी २४४७ हेल्थ केअर कंट्रोल रूम आणि आरोग्यसेवा आपल्या दारी (हेल्थ-टू-होम) या सेवा सुरू करणार. - महापालिका स्वतःच्या मालकीची रूग्णवाहिका आणि शववाहिनी सेवा सुरू करणार. मुंबई महापालिकेचं स्वतःचं सुपर स्पेशालिटी कॅन्सर रुग्णालय असेल. - रॅपिड बाईक मेडिकल असिस्टंन्स (अॅम्ब्युलन्स) सेवा.. - मुंबईकरांना रॅपिडोच्या बाईकची नव्हे तर वाहतूककोंडीच्या तासांमध्येही अगदी गल्लीबोळात सहज आणि वेळेवर पोहोचेल अशा रॅपिड बाईक मेडिकल असिस्टंन (अॅम्ब्यूलन्स) सेवेची आवश्यकता आहे. - गंभीर रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना तसंच हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक आलेल्या रुग्णांना प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी (पॅरामेडिकल स्टाफ) बाईकवर उपलब्ध असलेल्या जीवनरक्षक उपकरणांच्या (हार्ट शॉक मशीन - Defibrillator, ऑक्सिजन, नेब्यूलायजर आदींच्या) सहाय्याने 'गोल्डन अवर' मध्ये प्राथमिक उपचार करतील आणि रुग्णाला लवकरात लवकर नजीकच्या रुग्णालयात पोहोचवतील. कचरा व्यवस्थापन - मानखुर्द डम्पिंग ग्राऊंड येथील बायो-मायनिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान उभारणार. - प्रस्तावित कचरा कर मुंबईकरांवर लादला जाणार नाही. - पुढील १० वर्षांत कांजूरमार्ग कचराभूमी बंद करून, महापालिकेच्या २४ प्रभागांत स्थानिक पातळीवरच कचऱ्यावर प्रक्रिया करणारी केंद्र उभारली जातील. - मुंबईकरांची जीवनशैली आणि वाहतुकीची रहदारी पहाता रात्रीच्या वेळची यांत्रिक सफाई (Mechanised Sweeping) मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येईल. - कंस्ट्रक्शन डिमोलिशन डेब्रिसवर (राडारोडा) महापालिकेकडून प्रोसेसिंग करणार. - मलनिःसारण वाहिन्यांची व्याप्ती वाढवणार : २०१७ मध्ये ही क्षमता- व्याप्ती ५६ टक्के होती. आता ८६ टक्के आहे. पुढील ५ वर्षांत १०० टक्के पूर्ण करणार.























