(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Afghanistan : जगात चिंतेचे वातावरण असताना चीनचा तालिबानकडे मैत्रीचा हात
Afghanistan News : चीनने तालिबानशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास तयार असल्याची माहिती एएफपी या वृत्तसंस्थेने दिली आहे.
काबुल : अफगाणिस्तानवर आता तालिबानने नियंत्रण प्रस्थापित केलं असून राष्ट्रपती अशरफ घनी हे देश सोडून गेले आहेत. या बिघडलेल्या परिस्थितीमुळे अफगाणिस्तानमध्ये आता अनागोंदी माजली आहे. या बिघडलेल्या परिस्थितीमुळे शांतताप्रिय देशामध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान या परिस्थितीत चीनने तालिबानशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
चीनची ही भूमीका अशा वेळी घेतली की तालिबान काही दिवसातच अफगाणिस्तानचा ताबा घेतल्याची घोषणा करणार आहे. रविवारी तालिबानच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, काबुल स्थित राष्ट्रपती परिसरातून अफगाणिस्तानला इस्लामी अमीरात बनवल्याची घोषणा करण्यात येईल.
अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी तालिबान्यांसमोर शरणागती पत्करली आहे. अशरफ घनी यांनी अफगाणिस्तानच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अफगाणिस्तान सोडल्यानंतर गनी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, माझ्याकडे त्यावेळी दोन पर्याय होते. राष्ट्रपती भवनात प्रवेश करणाऱ्या सशस्त्र तालिबान्यांचा सामना करणे हा पहिला पर्याय होता. किंवा ज्या देशाच्या सुरक्षेसाठी मी माझ्या आयुष्याचे 20 वर्ष खर्च केले तो देश सोडून जाणे हा दुसरा पर्याय होता.
China says willing to develop 'friendly relations' with Afghanistan's Taliban: AFP News Agency
— ANI (@ANI) August 16, 2021
रविवारी जलालाबाद ताब्यात घेतले
राजधानी काबुलच्या बाहेरील भागात प्रवेश करण्यापूर्वी अतिरेकी गटाने रविवारी सकाळी जलालाबादवर कब्जा केला. काही तासांनंतर, रविवारी, अमेरिकन बोईंग सीएच -47 हेलिकॉप्टर येथील अमेरिकन दूतावासात उतरले. काबूल व्यतिरिक्त जलालाबाद हे एकमेव मोठे शहर होते जे तालिबान पकडीतून वाचले होते. हे पाकिस्तानच्या मुख्य सीमेजवळ आहे. आता अफगाणिस्तानच्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या देशाच्या 34 प्रांतीय राजधानींपैकी काबूल व्यतिरिक्त इतर फक्त सहा प्रांतीय राजधानी तालीबानीपासून वाचल्या आहेत.
UNSC ची अफगान प्रश्नावर आज बैठक
अफगाणिस्तानवर आता तालिबानने नियंत्रण प्रस्थापित केल्यानंतर अनागोंदी माजली असून या विषयावर भारतीय प्रमाणवेळेनुसार, आज संध्याकाळी साडे सात वाजता संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. भारतीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे या बैठकीचे अध्यक्ष असतील.
भारतासहित जगातल्या प्रमुख राष्ट्रांचे अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर बारीक लक्ष आहे. आजच्या बैठकीत तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर प्रस्थापित केलेल्या नियंत्रणावर चर्चा होणार आहे. पण अफगाणिस्तानच्या प्रश्नावर त्या देशाची बाजू कोण आणि कशा प्रकारे मांडणार, त्या संबंधी पुढाकार कोण घेणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
संबंधित बातम्या :
- Afghanistan : अपहरणाची भीती, संपत आलेले इंधन आणि हवेत 12 चकरा; एअर इंडियाच्या 'त्या' विमानाचा थरार
- IN PICS : तालिबानने कब्जा केल्यानंतर आजच्या अफगाणिस्तानचे चित्र कसं आहे?
- Afghanistan : 25 वर्षापूर्वीचा काळा इतिहास; तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींची निर्घृणपणे हत्या करुन मृतदेह खांबावर लटकवला