एक्स्प्लोर
रशियाची सूत्र पुन्हा व्लादिमीर पुतीन यांच्या हाती
2012 साली जेव्हा व्लादिमीर पुतीन रशियाच्या अध्यक्षपदी जिंकले, त्यावेळी त्यांना 64 टक्के मतं मिळाली होती. 2018 म्हणजे यावेळी 76 टक्के मतं मिळाली आहेत. म्हणजेच, मतांची टक्केवारी वाढलेली दिसून येते.
मॉस्को : रशियाचं नेतृत्त्व पुन्हा एकदा व्लादिमीर पुतीन यांच्या हाती आले आहे. रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तब्बल 76 टक्के मतं मिळवत व्लादिमीर पुतीन यांनी एकहाती विजय मिळवला आहे. त्यामुळे पुतीन आता आणखी सहा वर्षे रशियाची धुरा सांभाळणार आहेत.
गेल्या काही वर्षांमधील कामांमुळेच मला इतक्या मोठ्या संख्येत मतं मिळाली, अशी पहिली प्रतिक्रिया व्लादिमीर पुतीन यांनी दिली. मतमोजणीचे पहिले काही कल हाती आल्यानंतर पुतीन यांनी मॉस्कोत एक सभा घेऊन जनतेचे आभार मानले.
यावेळी पत्रकारांनी पुतीन यांना विचारले, "तुम्ही सहा वर्षांनी पुन्हा निवडणूक लढणार आहात का?". त्यावर उत्तर देतना पुतीन म्हणाले, "तुम्ही माझी मस्करी करत आहात का? तुम्हाला काय वाटतं की, माझे वय 100 वर्षे होईपर्यंत इथेच राहू का? असे नाही होणार."
2012 साली जेव्हा व्लादिमीर पुतीन रशियाच्या अध्यक्षपदी जिंकले, त्यावेळी त्यांना 64 टक्के मतं मिळाली होती. 2018 म्हणजे यावेळी 76 टक्के मतं मिळाली आहेत. म्हणजेच, मतांची टक्केवारी वाढलेली दिसून येते.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्लादिमीर पुतीन यांना सर्वात मोठा स्पर्धक ज्यांना मानले जात होते, त्या पॉवेल गुरुदिनीन यांना केवळ 12 टक्के मते मिळाली. पॉवेल कम्युनिस्ट आहेत. या निवडणुकीत कसेनिया सोबचकही होत्या, त्यांना केवळ 2 टक्के मतं मिळाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement