एक्स्प्लोर
रनवेवरुन विमान घसरलं, समुद्रापासून काही फुटांवर अडलं
विमानातील सर्व 168 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली.
![रनवेवरुन विमान घसरलं, समुद्रापासून काही फुटांवर अडलं Turkish plane skids off runway, stops before Black Sea latest update रनवेवरुन विमान घसरलं, समुद्रापासून काही फुटांवर अडलं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/15144646/Turkey-Black-sea-flight.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अंकारा, तुर्कस्तान : पेगासस एअरलाईन्सचं विमान लँडिंग करताना रनवेवरुन घसरलं, सुदैवाने समुद्रात कोसळ्यापूर्वीच उतारावर अडल्यामुळे विमानातील सर्व प्रवासी आणि केबिन क्रू बचावले आहेत. काळ्या समुद्रापासून अवघ्या काही फुटांवर हे विमान थांबलं.
उत्तर तुर्कस्तानातील ट्रेबझॉन विमानतळावर लँडिंग करताना हा अपघात घडला. विमानतळावरील रनवे हा ब्लॅक सीच्या किनाऱ्याला लागूनच आहे. पेगासस एअरलाईन्सचं बोईंग 737 पॅसेंजर विमान लँड होताना रनवेवरुन घसरलं. उतारावरील मातीमुळे विमान अडलं. विमानाचं तोंड समुद्रापासून अवघ्या काही फुटांवर होतं.
विमानातील सर्व 168 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली. जर विमान आणखी घसरलं असतं, तर प्रवाशांना समुद्रात जलसमाधी मिळाली, असं म्हटलं जात आहे. PC8622 या विमानात 162 प्रवासी आणि दोन पायलट्ससह 6 केबिन क्रू होते. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसल्याचं एअरलाईन्सतर्फे सांगण्यात येत आहे.
बचावलेल्या प्रवाशांनी हा चमत्कार असल्याचं सांगत देवाचे आभार मानले आहेत. विमान रनवेवरुन घसरताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. विमान फुटण्याची, आग लागण्याची किंवा पाण्यात कोसळण्याची शक्यता होती, मात्र असं काहीच न झाल्यामुळे आम्ही वाचलो, असं प्रवाशांनी सांगितलं.
अपघातानंतर काही तासांसाठी विमानतळावरील सेवा खंडित करण्यात आली होती. हा अपघात कसा घडला, याची चौकशी केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
विश्व
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)