US F-15 Fighter Jet Crash: इराणने अमेरिकेची तीन F-15 फायटर जेट पाडली? आता अमेरिकेच्या लष्कराचा मोठा खुलासा
US F-15 Fighter Jet Crash: अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे तसेच इराणच्या तुफानी प्रतिहल्ल्यांमुळे मध्य पूर्वेत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

US F-15 Fighter Jet Crash: अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात तुफानी हल्ले सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर कुवेतकडून ‘चुकून’ अमेरिकन एअरफोर्सचे तीन F-15 लढाऊ विमाने पाडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची पुष्टी अमेरिकन लष्कराने केली आहे. कुवेत लष्करानेही ही घटना मान्य केली असून, सुरू असलेल्या ऑपरेशनमध्ये सहकार्य केल्याबद्दल अमेरिकन लष्कराने कुवेतच्या संरक्षण दलांचे आभार मानले आहेत.
US F-15 Fighter Jet Crash: कुवेतने चुकून F-15 पाडले
सेंट्रल कमांडकडून सांगण्यात आले की, “इराणविरोधातील मोहिमेदरम्यान कुवेतने चुकून अमेरिकेची 3 एफ-15 ई स्ट्राइक ईगल लढाऊ विमाने पाडली.” अमेरिकन लष्कराकडून हेही स्पष्ट करण्यात आले की, अपघातग्रस्त झालेल्या तिन्ही एफ-15 विमानांतील सर्व सहा वैमानिक सुरक्षित आहेत. त्यांनी सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यश मिळवले असून त्यांना सुरक्षितरीत्या वाचवण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
At 11:03 p.m. ET, March 1, three U.S. F-15E Strike Eagles flying in support of Operation Epic Fury went down over Kuwait due to an apparent friendly fire incident.
— U.S. Central Command (@CENTCOM) March 2, 2026
Read more:https://t.co/i2y3Q3vo2E
नायटेड स्टेट्स सेंट्रल कमांड (सेंटकॉम) यांच्या माहितीनुसार, 1 मार्च रोजी पूर्वेकडील वेळेनुसार रात्री 11 वाजून 03 मिनिटांनी ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’च्या समर्थनार्थ उड्डाण करत असलेली अमेरिकेची तीन एफ-15 ई स्ट्राइक ईगल लढाऊ विमाने कुवेतच्या हवाई क्षेत्रात स्पष्टपणे मैत्रीपूर्ण गोळीबाराच्या घटनेमुळे कोसळली. अमेरिकन लष्कराने म्हटले आहे की, इराणविरोधातील मोहिमेदरम्यान कुवेतकडून चुकून अमेरिकेची 3 एफ-15 ई स्ट्राइक ईगल लढाऊ विमाने पाडण्यात आली.
US F-15 Fighter Jet Crash: इराणने F-15 लढाऊ विमान पाडल्याचा केला होता दावा
यापूर्वी इराणकडून एक F-15 लढाऊ विमान पाडल्याचा दावा करण्यात आला होता. यासंदर्भातील एक व्हिडिओही समोर आला होता, ज्यामध्ये एक विमान संथ गतीने खाली कोसळताना दिसत होते आणि त्याच्या मागील भागातून आगीच्या ज्वाळा निघताना दिसत होत्या. हे विमान त्या वेळी कुवैतच्या हवाई क्षेत्रातून उड्डाण करत होते. मात्र, ते विमान अमेरिकेचे होते की इस्रायलचे, हे त्यावेळी स्पष्ट झाले नव्हते. दरम्यान, कुवेतच्या संरक्षण मंत्रालयाने “अनेक अमेरिकन लष्करी विमाने कोसळली आहेत,” अशी पुष्टी केली.
आणखी वाचा
























