James Webb Space Telescope Launching: जगातील सर्वात शक्तिशाली अवकाश दुर्बिणीचं आज अवकाशात प्रक्षेपण
James Webb Space Telescope Launching: नासा आणि इसा (युरोपियन स्पेस एजन्सी) दोन्ही मोठ्या संस्था मिळून हे प्रेक्षपण फ्रेंच गियानामधून करणार आहेत.
James Webb Space Telescope Launching: जगातील सर्वात शक्तिशाली 'जेम्स वेब स्पेस' नावाच्या अवकाश दुर्बिणीचं आज सायंकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी अवकाशात प्रक्षेपण केलं जाणार आहे. नासा आणि इसा (युरोपियन स्पेस एजन्सी) दोन्ही मोठ्या संस्था मिळून हे प्रेक्षपण फ्रेंच गियानामधून करणार आहेत. आत्तापर्यतचा सर्वात शक्तिशाली टेलिस्कोप हबल चा उत्तराधिकारी असं या दुर्बिणीला संबोधलं जातंय. विश्वाची निर्मिती तसंच विश्वाबद्दलच्या अनेक अज्ञात पैलुंची या दुब्रिणीमुळं उकल होण्यास मदत होईल, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. सुमारे 6.5 टन वजनाची अवकाश दुर्बिण दक्षिण अमेरिकेतील फ्रान्स देशाच्या फ्रेंच गयाना या तळावरुन युरोपियन स्पेस एजन्सीच्या एरियन -5 या शक्तीशाली प्रक्षेपकाच्या सहाय्यानं प्रक्षेपित केली जाणार आहे.
अवकाशात दुरवर बघण्याची आणि विश्वातील पहिल्या दीर्घिकेच्या निर्मितीचे गूढ उलगडून दाखवण्याची अफाट क्षमता असलेली सर्वात शक्तिशाली अवकाश दुर्बिण ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’च्या प्रेक्षपणाची, अवकाशात पाठवण्याची तारिखेत बदल करण्यात आला होता. स्पेस जेम्स वेबचं 22 डिसेंबरला प्रक्षेपित केलं जाणार होतं. मात्र, नासानं या प्रक्षेपणाच्या तारखेत बदल केला. तसेच हे प्रक्षेपण 24 डिसेंबरपूर्वी होऊ शकत नसल्याचं स्पष्ट केलं. अखेर आज ख्रिसमसच्या दिवशी 'जेम्स वेब स्पेस'चं प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
नासाचं ट्वीट-
नासा, युरोपियन स्पेस एजन्सी आणि कॅनडा स्पेस एजन्सी यांनी संयुक्तरित्या या अवकाश दुर्बिणीची निर्मिती केलीय. या दुर्बिणीच्या निर्मितीला 2005 ला सुरुवात झाली. परंतु, विविध कारणांमुळं या दुर्बिणीच्या निर्मितीला उशीर होत गेला. कॅलिफोर्निया येथे काही महिन्यांपूर्वी या दुर्बिणीच्या सर्व चाचण्या यशस्वीरित्या पुर्ण झाल्या. कोरोना महामारीमुळं काही महिने या दुर्बिणीचे काम ठप्प झालं होतं. अखेर या दुर्बिणीला अवकाशात नियोजित ठिकाणी नेण्याचा कार्यक्रम जाहिर करण्यात आलाय. या दुर्बिणीच्या निर्मितीला 10 अब्ज डॉलर्सपर्यंत खर्च आलाय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
- लसीचा बुस्टर डोस घेतला असला तरी गर्दी टाळाच, व्हाईट हाऊसचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. अँथनी फाऊचींचा सल्ला
- खाद्यपदार्थांच्या चवीची आभासी अनुभूती देणारे उपकरण विकसीत, 'टेस्ट द टीव्ही' असं उपकरणाचं नाव
- Pfizer COVID Pill : ओमायक्रॉनचं संकट! अमेरिकेत 12 वर्षांवरील सर्वांसाठी फायझर टॅबलेट्सच्या आपत्कालीन वापराला मंजुरी