खाद्यपदार्थांच्या चवीची आभासी अनुभूती देणारे उपकरण विकसीत, 'टेस्ट द टीव्ही' असं उपकरणाचं नाव
जपानच्या मीजी विद्यापीठातील प्राध्यापीका असलेल्या होमी मियाशिता यांनी एक प्रोटोटाइप टच टीव्ही स्क्रीन विकसीत केली आहे. याद्वारे विविध खाद्यपदार्थांच्या चवीची आभासी अनुभूती घेणे शक्य होणाराय.
टोकियो : जपानच्या मीजी विद्यापीठातील प्राध्यापीका असलेल्या होमी मियाशिता यांनी एक प्रोटोटाइप टच टीव्ही स्क्रीन विकसीत केली आहे. त्यामुळे टीव्ही स्क्रीनवर विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या चवीची आभासी अनुभूती घेणे शक्य होणार आहे. बहु-संवेदी दृश्य अनुभव तयार करण्याच्या दिशेने टाकेलल हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. टेस्ट द टीव्ही (TTTV) असे या उपकरणाचे नाव आहे. हे उपकरण, 10 फ्लेवरिंग कॅनिस्टर्सचे कॅरोसेल वापरते, जे विशिष्ट खाद्यपदार्थाची चव तयार करण्यासाठी एकत्रितपणे स्प्रे करते.
कोविड-19 च्या काळात, या तंत्रज्ञानामुळे लोक बाहेरील जगाशी संपर्क साधण्याचा आणि संवाद साधण्याचा मार्ग वाढवू शकतात. लोकांना घरी असतानाही जगाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या रेस्टॉरंटमधील जेवणाचा अनुभव मिळावा, हेच यामागचे उद्दिष्ट असल्याची माहिती मीजी विद्यापीठातील प्राध्यापीका होमी मियाशिता यांनी दिली. मियाशिता या 30 विद्यार्थ्यांच्या टीमसोबत काम करतात. त्यांची ही टीम विविध प्रकारच्या स्वाद-संबंधित उपकरणे तयार करण्याचे काम करते. ज्यामध्ये खाद्यपदार्थांची चव समृद्ध करणाऱ्या काट्याचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी स्वतः टेस्ट द टीव्ही (TTTV) प्रोटोटाइप तयार केले आहे. हे एक उपकरण तयार करण्यासाठी जवळपास 1 लाख येन ($875) एवढा खर्च येणार असल्याची माहिती मियाशिता यांनी दिली.
तयार केलेल्या या उपकरणामध्ये सॉमेलियर्स आणि कुकसाठी दूरस्थ शिक्षण, टेस्टिंग गेम्स, प्रश्नावली यांचा समावेश आहे. टोस्ट केलेल्या ब्रेडच्या स्लाइसवर पिझ्झा किंवा चॉकलेटची चव घेता येऊ शकणारे तंत्रज्ञान विकसीत करण्याबाबत देखील कंपन्यांशी चर्चा सुरू असल्याची माहिती मियाशिता यांनी दिली. याबाबत मीजी विद्यापीठातील 22 वर्षीय विद्यार्थी युकीने पत्रकारांसाठी टेस्ट द टीव्ही याचे प्रदर्शन करुन माहिती दिली. तसेच प्रात्यक्षिक देखील करुन दाखवले.
मीजी विद्यापीठाबाबत
मीजी विद्यापीठ हे जपानमधील खासगी विद्यापीठ असून, जे टोकियो आणि कावासाकी येथे आहे. ते जपानमधील सर्वात मोठे आणि सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठ आहेत. हे विद्यापीठ स्नातक ते पदव्युत्तर पर्यंत शिक्षण देत असून, विशेष कार्यक्रम देखील याठिकाणी चालतात. मीजी युनिव्हर्सिटीत प्रवेश मार्गदर्शक आहे, जो नवीन विद्यार्थ्यांना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी व त्यांचे उद्दीष्टांचे मार्गदर्शन करतो. या विद्यापीठात शिवकवण्यासाठी जागतिक दर्जाचे पुरस्कारप्राप्त व्याख्याते आणि प्राध्यापक आहेत.