एक्स्प्लोर

Pfizer COVID Pill : ओमायक्रॉनचं संकट! अमेरिकेत 12 वर्षांवरील सर्वांसाठी फायझर टॅबलेट्सच्या आपत्कालीन वापराला मंजुरी

Pfizer COVID Pill :  फायझरच्या (Pfizer) कोविड टॅबलेटच्या (Covid19 Pill) आपत्कालीन वापराला युरोपियन युनियन औषध नियामक (EU Drug Regulator) विभागाने मंजुरी दिली

Pfizer COVID Pill :  फायझरच्या (Pfizer) कोविड टॅबलेटच्या (Covid19 Pill) आपत्कालीन वापराला युरोपियन युनियन औषध नियामक (EU Drug Regulator) विभागाने मंजुरी दिली आहे. यानंतर काल अमेरिकेने या अँटी-कोविड टॅबलेट्सला 12 आणि त्याहून अधिक वयाच्या उच्च-जोखीम असलेल्या लोकांसाठी अधिकृत केलं आहे. 

दोन प्रकारच्या टॅब्लेट्सचा समावेश असलेल्या Paxlovid ला फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) ने आपत्कालीन वापराची परवानगी दिली आहे. ही टॅबलेट्स हॉस्पिटलायझेशन आणि जोखीम असलेल्या लोकांमधील मृत्यूचा धोका 88 टक्क्यांनी कमी करण्यासाठी उपयोगी ठरली आहे. व्हाईट हाऊसचे कोविड समन्वयक जेफ झियंट्स यांनी सांगितले की, USने उपचारासाठी 10 दशलक्ष टॅबलेट्स खरेदी करण्यासाठी $ 5.3 अब्ज खर्च केले आहेत.

युरोपियन युनियनच्या औषध नियामक विभागाने कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटशी (Omicron Variant) दोन हात करण्यासाठी फायझरच्या कोविड टॅबलेटच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. युरोपियन मेडिसिन एजन्सीने (EMA) जी युरोपियन युनियन (EU) साठी औषधी उत्पादनांच्या मूल्यमापन आणि पर्यवेक्षणाची जबाबदारी घेते, त्यांनी सदस्य राज्यांमध्ये फायझर कोविड टॅबलेट आपत्कालीन वापरासाठी मंजूर केली आहे. आपत्कालीन वापरास परवानगी मिळणार ही दुसरी टॅबलेट ठरली आहे. या आधीच युरोपियन मेडिसिन एजन्सीने मर्क (Merck) च्या कोविड टॅबलेटसाठी आणीबाणीच्या वापरास मान्यता दिली आहे.

अमेरिकन औषध कंपनी फायझरने दावा केला आहे की, ''फायझरची कोविड टॅबलेट ओमायक्रॉन व्हेरियंटवर प्रभावी आहे. या टॅबलेटचा वापर करुन रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण आणि कोरोनाबळींची संख्या कमी करण्यास 90 टक्के परिणामकारक ठरेल.''

युरोपियन मेडिसिन एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे की, "फायझरची कोविड टॅबलेट अद्याप युरोपियन युनियनमध्ये वापरास परवानगी नाही. मात्र या टॅबलेटचा वापर प्रौढांवर कोरोना उपचार करण्यासाठी केला जाऊ शकते. ज्या रुग्णांना पूरक ऑक्सिजनची आवश्यकता नाही आणि ज्यांना गंभीर आजार होण्याचा धोका वाटतो, अशा कोरोना रुग्णांवरील उपचारात फायझर कोविड टॅबलेट वापरण्यास मंजुरी आहे." एका रिपोर्टनुसार युरोपियन मेडिसिन एजन्सीने हा सल्ला राष्ट्रीय अधिकार्‍यांना पाठिंबा देण्यासाठी जारी केला आहे जे औषधाच्या संभाव्य वापराचा वापराचा निर्णय घेऊ शकतात.

गोळीमध्ये पॅक्सलोविड (Paxlovid) हे नवीन रेणू PF-07321332 आणि HIV अँटीव्हायरल रिटोनावीर (Ritonavir) यांचे संयोजन आहे, जे वेगळ्या टॅबलेट म्हणून घेतल्या जाते. युरोपियन मेडिसिन एजन्सीने म्हटले आहे की, कोविड-19 चे निदान झाल्यानंतर आणि लक्षणे दिसू लागल्यानंतर पाच दिवसांच्या आत पॅक्सलोविडचा वापर शक्य तितक्या लवकर करावा. अशावेळी फायझरच्या टॅबलेट आणखी पाच दिवस घ्याव्यात. 

काय आहेत दुष्परिणाम?
फायझरच्या कोविड टॅबलेटचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. चव कमी होणे, जुलाब किंवा उलट्या होणे किंवा तसा भास होणे, असे काही सौम्य दुष्परिणाम जाणवू शकतात. गर्भवती महिलांनी या टॅबलेट वापरु नयेत आणि ते घेत असल्यास स्तनपान थांबवावे.  

महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik BJP-NCP Rada | नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा, शरद पवार-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामनेBaramati Vidhan Sabha Election | पवार VS पवार बारामतीत कुणाची? स्थानिक पत्रकारांना काय वाटतं?Zero Hour Guest Centre : विधानसभेसाठी मविआचे कोणते मुद्दे चर्चेत? जिकंणार कोण?Zero Hour Rahul Gandhi | प्रचाराचा शेवटचा दिवस, एक है तो मोदी-अदानी सेफ है, राहुल गांधींची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget