एक्स्प्लोर
रशियन हेलिकॉप्टरवर सिरियात हल्ला, 5 जणांचा मृत्यू
मॉस्को : रशियाचं Mi-8 हेलिकॉप्टर सिरियामध्ये बॉम्बने उडवण्यात आलं आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने या घटनेला दुजोरा दिला असून हेलिकॉप्टरमधील पाचही जणांचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांबाबत अद्याप कोणतीही माहिती रशियन सरकारने उघड केलेली नाही. सिरियातील अलेप्पो शहरात मदतकार्य करुन रशियाच्या एअर बेसवर परतणाऱ्या या हेलिकॉप्टरवर हल्ला झाल्याची माहिती आहे.
सिरियातील इडलिब प्रांतात Mi-8 या वाहतूक करणाऱ्या हेलिकॉप्टरवर हल्ला झाला. मानवतावादी कार्य करताना ते एखाद्या हिरोसारखे गेले, असं शासनातर्फे म्हटलं गेलं आहे. इस्लामी राज्यांकडून असलेल्या दहशतवादी कारवायांच्या भीतीच्या पार्श्वभूमीवरही रशिया आंतरराष्ट्रीय दहशतवादाशी लढा देत राहील, असंही सरकारतर्फे निक्षून सांगण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement