एक्स्प्लोर

Trump Attack Plan: अमेरिका वीकेंडलाच अटॅक का करतो? यामागील डोनाल्ड ट्रम्प यांची खेळी काय? जाणून घ्या सविस्तर

Trump Attack Plan: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या प्रत्येक निर्णयामागे एक विशिष्ट रणनीती असते. आठवड्याच्या शेवटी झालेल्या लष्करी कारवाईमागे ट्रम्प यांचाचं डोकं असल्याचं बोललं जातंय.

Trump Attack Plan:  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या लष्करी निर्णयांमागे ठराविक रणनीती कार्यरत असल्याची चर्चा आहे. अलीकडे व्हेनेझुएला आणि इराणविरोधातील कारवाया शनिवार-रविवारी झाल्याने, वीकेंडची निवड ही केवळ योगायोग नसून नियोजित (Trump Attack Plan) धोरणाचा भाग असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी रात्री अमेरिकेने इराणविरोधात लष्करी पावले उचलली. यापूर्वीही अशाच प्रकारे विकेंडलाच हल्ले करण्यात आले होते. त्यामुळे बाजारपेठा, तेलपुरवठा आणि कूटनीतिक घडामोडींचा विचार करून वेळेची निवड केली जाते का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.(Trump Attack Plan)

वीकेंडची निवड का?

तज्ज्ञांच्या मते, यामागे जागतिक शेअर बाजार आणि तेल बाजाराचा विचार असू शकतो. आठवड्याच्या शेवटी बहुतेक देशांचे शेअर बाजार बंद असतात. जर लष्करी कारवाई कामकाजाच्या दिवशी झाली, तर बाजारात तात्काळ घबराट निर्माण होऊ शकते. वीकेंडदरम्यान कारवाई झाल्यास सरकारे आणि गुंतवणूकदारांना परिस्थितीचे मूल्यमापन करण्यासाठी वेळ मिळतो. सोमवारी बाजार सुरू होईपर्यंत प्राथमिक नुकसानाचा अंदाज येतो आणि अचानक घसरण किंवा उसळी टाळता येते.(Trump Attack Plan)

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे तेल बाजार. मिडल ईस्टमध्ये तणाव वाढला की कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढतात. जर बाजार खुले असताना हल्ले झाले, तर दरात तीव्र चढ-उतार होण्याची शक्यता असते. वीकेंडमध्ये कारवाई झाल्यास तेलपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी देशांना आणि ओपेकसारख्या संघटनांना संधी मिळू शकते.(Trump Attack Plan)

केवळ बाजार नव्हे, इतर घटकही महत्वाचे

अहवालांनुसार, लष्करी निर्णय केवळ आर्थिक बाजारपेठ लक्षात घेऊन घेतले जात नाहीत. राष्ट्रीय सुरक्षा, सामरिक हितसंबंध आणि राजकीय कारणेही तितकीच महत्त्वाची असतात. मात्र कारवाईची वेळ ठरवताना जागतिक परिणाम कमी कसे ठेवता येतील, याचाही विचार केला जातो.

भारतासाठी का चिंतेचा विषय?

भारत आपल्या गरजेपैकी मोठा हिस्सा कच्च्या तेलाचा मिडल ईस्टमधून आयात करतो. त्यातील बहुतांश पुरवठा स्ट्रेट ऑफ होर्मुजमार्गे येतो. या भागात तणाव वाढल्यास किंवा मार्गात अडथळा निर्माण झाल्यास भारताला तेल महागात मिळू शकते. तेलाच्या किमती वाढल्यास देशांतर्गत पेट्रोल-डिझेल दर वाढण्याची शक्यता असते. त्याचा थेट परिणाम महागाईवर होऊ शकतो. वाहतूक खर्च वाढल्यास दैनंदिन वापराच्या वस्तूही महाग होऊ शकतात. तसेच तेल आयातीवरील खर्च वाढल्यास देशाचे आयात बिल आणि चालू खाते तूट वाढण्याची शक्यता असते. सध्या मोठ्या प्रमाणात पुरवठा खंडित झाल्याचे संकेत नसले तरी, सततचा तणावही दर उंचावण्यासाठी पुरेसा ठरतो. त्यामुळे अशा लष्करी कारवाया भारतासारख्या तेल आयातीवर अवलंबून असलेल्या देशासाठी चिंतेचा विषय ठरतात.

महत्त्वाच्या बातम्या

गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
Embed widget