Russia Ukraine Conflict : 'स्मार्टफोन' मार्केटवरही पडणार रशिया-युक्रेन युद्धाचा प्रभाव, किंमत वाढणार; जाणून घ्या काय आहे कारण...
रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. याचाच परिणाम आता इतर अनेक गोष्टींवर होताना दिसत आहे.
रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. याचाच परिणाम आता इतर अनेक गोष्टींवर होताना दिसत आहे. कोरोना काळात आधीच फटका बसलेल्या इलेक्ट्रॉनिक आणि मोबाइल उद्योगावरही या युद्धाचा परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, युद्धामुळे स्मार्टफोनच्या किमतीवरही परिणाम होऊ शकतो.
असा पडू शकतो प्रभाव
एका रिपोर्टनुसार, युक्रेन हा निऑन गॅसचा सर्वात मोठा उत्पादक आहे. चिप बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लेझरसाठी या गॅसचा वापर केला जातो. हे यू.एस. सेमीकंडक्टर-ग्रेड 90 टक्के निऑन (U.S. Semiconductor-Grade Neon) पाठवते. तसेच पॅलेडियमच्या बाबतीत जग हे मोठ्या प्रमाणात रशियावर अवलंबून आहे. या दुर्मिळ धातूचा उपयोग सेमीकंडक्टर चिप बनवण्यासाठीही केला जातो. आता रशिया आणि युक्रेनमध्ये तणाव असल्याने अनेक कंपन्यांना याचा फटका बसणार आहे. याशिवाय अमेरिकेच्या निर्बंधांमुळे रशियाकडून होणारा मायक्रोचिपचा पुरवठाही थांबणार आहे.
हे आहेत पर्याय
या कंपन्यांकडे आता चीन, अमेरिका आणि कॅनडाचा पर्याय असू शकतो. या कंपन्या तेथून या गोष्टी मागवू शकतात. मात्र इतकं पुरेसे नसून ही प्रक्रिया देखील अतिशय मंद असेल. जर रशिया आणि युक्रेनमधील युद्ध 8-10 दिवस सुरू राहिले, तर 15-20 दिवसांनंतर या मोबाइल कंपन्यांसाठी गोष्टी मॅनेज करण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे सेमीकंडक्टर आणि मोबाईलमध्ये वापरल्या जाणाऱ्या मायक्रोचिपचा पुरवठाही ठप्प होणार आहे.
दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी एअर इंडियाचे विमान बुखारेस्टला पोहोचले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाच्या विमानाने शनिवारी सकाळी रोमानियाची राजधानी बुखारेस्टसाठी मुंबई विमानतळावरून उड्डाण केले. युक्रेनमधून भारतीय नागरिकांना घेऊन रोमानियाहून एअर इंडियाचे विमान आज दुपारी चार वाजता मुंबईत दाखल होणे अपेक्षित आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine Crisis : युक्रेनमधील अडकलेल्या भारतीयांसाठी एअर इंडियाच्या फ्लाइट्स, पुतिन यांच्याकडून भारतीयांच्या सुरक्षेचे आश्वासन
- Russia Ukraine Crisis : 1200 भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वड्डेट्टीवार यांची माहिती
- Russia Ukraine War: 'मैं झुकेगा नही...', युक्रेनची रक्षा करण्यासाठी कीवमध्येच उभा; राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांचा व्हिडीओ व्हायरल