(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Russia Ukraine War: 'मैं झुकेगा नही...', युक्रेनची रक्षा करण्यासाठी कीवमध्येच उभा; राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांचा व्हिडीओ व्हायरल
Russia Ukraine War: राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की हे भूमिगत झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. आता झेलेन्स्की यांनी एक व्हिडीओ शेअर केला करून आपण कीवमध्येच असल्याचं स्पष्ट केलं आहे.
Russia Ukraine War: रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी कीवच्या उंबरठ्यावर पोहोचलं असताना युक्रेनचे अध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की हे भूमिगत झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. आता त्याला पूर्णविराम मिळाला असून आपण राजधानी कीवमध्येच आहे, युक्रेनची रक्षा करतोय असा संदेश देत व्होदिमर झेलेन्स्की यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे युक्रेनने अद्याप हार मानली नाही, किंवा रशियासमोर शरणागती पत्करली नाही हे स्पष्ट झालंय.
युक्रेनचे अध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. युक्रेनियन भाषेत असलेला हा व्हिडीओ 33 सेकंदांचा आहे. त्यामध्ये ते म्हणतात, मी इथेच आहे, कीवमध्ये आहे. युक्रेनची रक्षा करण्यासाठी लढतोय.
⚡️Ukraine’s Zelensky posts a new video of himself and his team outside the presidential administration in Kyiv’s government quarter after rumors in Russian media that he’d fled. “We are here. We are in Kyiv. We are defending Ukraine.” pic.twitter.com/bgHyrsbVFs
— Christopher Miller (@ChristopherJM) February 25, 2022
रशियाच्या हल्ल्याच्या भीतीने व्होदिमर झेलेन्स्की हे भूमिगत झाले, देश सोडून गेले अशा आशयाच्या अफवा पसरल्या जात होत्या. व्होदिमर झेलेन्स्की या ताज्या व्हिडीओमुळे त्याला आता पूर्णविराम मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, रशियाने हवाई दलाच्या माध्यमातून कीववर हल्ला सुरू ठेवला असून त्यामुळे या शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत. शहरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच बेसमेंट किंवा इतर भूयारांमध्ये सुरक्षित रहावं असं आवाहन युक्रेनच्या सैन्याने केलं आहे.
युक्रेनच्या अध्यक्षांचे जगभरातील देशांना आवाहन
युक्रेनमधील लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेले सरकार उलथवून लावण्याचा आणि देशावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न रशियाचा असून त्या विरोधात जगभरातील देशांनी युक्रेनच्या मदतीला यावं असं आवाहन युक्रेनचे अध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांनी केलं आहे. तसेच अमेरिका आणि युरोपने रशियावरील आर्थिक निर्बंध हे अधिक कडक करावेत अशीही मागणी त्यांनी केली आहे.
संबंधित बातम्या :
- Russia Ukraine War : 1000 पेक्षा जास्त रशियन सैनिक मारले; युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाचा दावा
- Russia Ukraine War: कीवचा पाडाव होणार? रशियाचे सैन्य युक्रेनच्या राजधानीच्या उंबरठ्यावर
- कॉमेडियन ते राष्ट्राध्यक्ष! आता हा पठ्ठ्या थेट पुतिन यांना भिडतोय अन् नडतोय... जाणून घ्या कसा आहे व्होदिमर झेलेन्स्की यांचा प्रवास