एक्स्प्लोर
रिअल स्पायडरमॅन, बाल्कनीतून पडणाऱ्या चिमुकल्याला तरुणाने वाचवलं!
यानंतर मामोदोऊचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पॅरिसमध्ये त्याला एक हिरो म्हणून पाहिलं जात आहे.

पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये एक खराखुरा स्पायडरमॅन पाहायला मिळाला. या स्पायडरमॅनने एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडत असलेल्या लहान मुलाचा जीव वाचवला. मामोदोऊ गसामा असं या धाडसी तरुणाचं नाव आहे. पॅरिसमध्ये शनिवारी संध्याकाळी एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन चार वर्षांचा मुलगा बाल्कनीतून पडत असल्याचं मामोदोऊने पाहिलं. मग जीवाची पर्वा न करता मामोदोऊने तळ मजल्यावरुनच वर चढायला सुरुवात केली. कोणत्याही सुरक्षेशिवाय बघता बघता एक मिनिटाच्या आत चौथ्या मजल्यावर जाऊन त्याने लहान मुलाचा जीव वाचवला. या घटनेच्या वेळी चिमुकला घरात एकटा असल्याचं समोर आलं आहे. यानंतर मामोदोऊचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पॅरिसमध्ये त्याला एक हिरो म्हणून पाहिलं जात आहे. अनेकांनी त्यांना 'स्पायडरमॅन' ही उपमाही दिली.
22 वर्षीय मामोदोऊ गसामा हा मूळचा आफ्रिकेतील माली या देशातला असून तो फ्रान्समध्ये स्थलांतरित म्हणून आला आहे. मामोदोऊच्या या धाडसामुळे फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी त्याचं कौतुक केलंच, पण त्याला फ्रान्सचं नागरिकत्व आणि अग्निशमन दलात नोकरी देऊ केली आहे. पाहा व्हिडीओHoly shit, this guy is amazing. What a hero. https://t.co/XVWbaULkFp pic.twitter.com/hHnF150XL5
— Hannah Jane Parkinson (@ladyhaja) May 27, 2018
आणखी वाचा























