एक्स्प्लोर
Advertisement
खाण्यासाठी जगणारे 'अंकल फॅटी' सोशल मीडियावर व्हायरल
बँकॉक : एखादा प्राणी दिसताच त्याला आपल्या हातातला खाऊ देण्याची सवय तुम्हाला आहे का? तसं असेल आणि तुम्ही त्याला भूतदया वगैरे समजत असाल तर जरा थांबा, विचार करा. थायलंडमधील अंकल फॅटींना भेटल्यावर तुमचा विचार कदाचित बदलेल.
बँकॉकच्या फ्लोटिंग मार्केटमध्ये माकडं कायम हिंडत असतात. यांच्यापैकी एका माकडाची सध्या सोशल मीडियावर हवा आहे. व्हायरल झालेलं हे माकड आहे अंकल फॅटी. जगण्यासाठी खाणं आणि खाण्यासाठी जगणं हा आहे अंकल फॅटींच्या जगण्याचा मूलमंत्र. खाणं हाच अंकल फॅटींचा एकमेव छंद आहे आणि हा छंद पुरवण्यासाठी प्राणीप्रेमी त्याला मोठ्या मनानं जंक फूडचा पुरवठाही करतात.
अंकल फॅटींची खासियत ही की ते कुठल्याच पदार्थाला पाहून नाक मुरडत नाहीत. नाक काय, साधं शेपूटही वाकडं करत नाहीत. जे मिळतं ते आपलं मानून पोटात सारतात. फक्त खाण्याचेच नाही तर अंकल फॅटी पिण्याचेही शौकीन आहेत. एका वाटसरुने सरबत देऊ केलं आणि अंकल फॅटींनी थेट बॉटल तोंडाला लावली.
अंकल फॅटींच्या या मस्तमौला जगण्याची दुसरी बाजूही आहेच, जी या व्हायरलच्या जमान्यात दुर्लक्षित होत आहे. अंकल फॅटींना या लठ्ठपणामुळे इतर माकडांसारखं सरसर झाडावर चढणं, उड्या मारणं सोडा, साधं जागचं हलणंही कठीण होऊन बसलं आहे.
या सगळ्याला कारणीभूत आहे ती माणसानं दाखवलेली नको तितकी भूतदया. तेव्हा क्षणिक आनंदासाठी पर्यटनस्थळी माकडांना खाऊ घालणाऱ्यांनो लक्षात ठेवा. तुमचा मेंदू त्यांच्यापेक्षा जास्त विकसित आहे. जमलंच तर त्याचा वापरही करा.
तुम्ही पोट वाढलं म्हणून पैसे खर्चून जिम लावू शकता. महागडा डाएट प्लान फॉलो करु शकता. पण या मुक्या प्राण्यांना तशी सोय नाही. इतकंच काय तर साधं तुमच्यासारखं चारचौघात गुपचूप पोट आत सारणंही त्यांना जमत नाही.
तेव्हा यापुढे फिरायला गेलात, एखादं माकड दिसलं. तर हातातला खाऊ पुढे करताना एक नजर त्याच्या पोटाकडेही टाका. म्हणजे कदाचित एखादा अंकल फॅटी व्हायरल होण्यापासून तुम्ही वाचवू शकाल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
भारत
Advertisement