एक्स्प्लोर
रेल्वे ट्रॅकवर फोटोशूट करणाऱ्या प्रेग्नंट मॉडेलला ट्रेनने उडवलं!
टेक्सास : रेल्वे ट्रॅकवर फोटोशूट करणाऱ्या एका प्रेग्नंट मॉडेलचा ट्रेनच्या धडकेने मृत्यू झाला. अमेरिकेच्या टेक्सासमध्ये ही घटना घडली आहे.
नेवासोटामध्ये 19 वर्षीय फ्रेझानिया थॉम्पसन रेल्वे ट्रॅकवर फोटोशूट करत होती. पण त्याच वेळी ट्रेन आली आणि धडकेत तिचा मृत्यू झाला.
रेल्वे ट्रॅकवरील तिचा हा शेवटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी फ्रेझानिया गरोदर होती. एका ट्रेनमधून उतरुन ती रेल्वे ट्रॅकवर फोटो काढत होती. पण त्याचवेळी दुसऱ्या ट्रेनने तिला उडवलं.
"फ्रेझानियाचं हे पहिलं फोटोशूट होतं. तिला हेच काम करायचं होतं," असं फ्रेझानियाची आई हॅकेमी स्टिवेन्सन यांनी सांगितलं.
दुसरीकडे, ज्या ट्रेनने फ्रेझानियाला उडवलं, त्या ट्रेनची कंपनी, युनियन पॅसिफिकचे प्रवक्ते जेफ डी ग्राफ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, "रेल्वे ट्रॅकवर फोटोशूट सुरु असल्याचं आम्ही पाहिलं नाही. मात्र ट्रेन जवळ आल्यावर चालकांच्या टीमने फोटोग्राफर आणि इतरांना ट्रॅकवर पाहिलं. त्यांना अलर्ट करण्यात आलं. तसंच ट्रेन थांबवण्याचाही प्रयत्न केला."
दरम्यान पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. परंतु घातपाताच्या शक्यता पोलिसांनी नाकारली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रीडा
बीड
क्रीडा
Advertisement