एक्स्प्लोर
Advertisement
ब्रिटनमध्ये खासदार जो कॉक्स यांची गोळी झाडून हत्या
लंडन: इंग्लंडमध्ये विरोधी पक्षाच्या महिला खासदाराची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जो कॉक्स यांच्यावर उत्तर इंग्लंडमध्ये त्यांच्या मतदारसंघात जीवघेणा हल्ला करण्यात आला.
हल्लेखोरांनी सुरुवातीला चाकूनं वार करुन नंतर त्यांच्यावर गोळीबार केला. पोलिसांनी 52 वर्षीय हल्लेखोराला अटक केलं आहे. त्याच्याकडून हत्यारंही जप्त करण्यात आली आहेत.
जो कॉक्स ही मागील वर्षीच खासदार म्हणून निवडून गेल्या होत्या. डेली मेल यांच्या वृत्तानुसार, मागील तीन महिन्यांपासून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या.
कॉक्स यांच्यावर हल्ला करण्यापूर्वी हल्लेखोर दोनदा जोरात ओरडला. 'ब्रिटनच्या हिताला प्राधान्य द्या.' कामगार पक्षाच्या खासदार कॉक्स या आपल्या मतदारसंघात मतदारांच्या भेटी घेत असतानाच हा हल्ला करण्यात आला.
हल्ल्यानंतर त्यांना 'लीड्स जनरल इनफर्मेरी' इथं त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांनी अटोकाट प्रयत्नही केला. मात्र, दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात आणखी एक जण जखमी झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement