एक्स्प्लोर

भारत-चीन वादाचं नेमकं कारण असलेलं डोकलामचं 'ए' टू 'झेड'

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी भारत-चीन सीमेवर सिक्कीम सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांची हाणामारी झाल्याची घटना समोर आली. शिवाय, काही दिवसांपासून चिनी वृत्तपत्रांमधूनही भारताला जाहीर धमक्या दिल्या जात आहेत. त्यातच आता कुरापतखोर चिनने हिंदी महासागरात युद्धनौका तैनात केल्या आहेत. त्यामुळे भारत आणि चीनमधील संबंध कमालीचे ताणले आहेत. पण या वादाचं नेमकं कारण असलेल्या डोकलामचा मुद्दा सध्या सर्वत्र चर्चेला जात आहे. 'डोकलाम' भारत-चीन-भूतानचं ट्रायजंक्शन सध्या सिक्किममध्ये भारत-चीनदरम्यान 220 किमीची सीमा आहे. यातील सर्व भागात शांततेचं वातावरण आहे. पण ज्या भागात चीन आणि भारताची सीमा भूतानला जोडली आहे, त्या भागावरुन उभय देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. भारत-भूतान दरम्यान सिक्किममध्ये 32 किमीची सीमा रेषा आहे. जवळपास 50 वर्षांपूर्वी म्हणजे 1967 मध्ये भारतीय लष्कराने सिक्किममध्ये चीनी सैन्याला धुळ चारली होती. त्यानंतर चीनकडून सिक्किमच्या भागात कधीही घुसखोरी झाली नाही. पण सध्या या तिन्ही देशांचं ट्रायजंक्शन असलेल्या डोकलाममध्ये तणावाची परिस्थिती आहे. काय आहे नेमकं प्रकरण? सूत्रांच्या मते, चीनने जेव्हा चुंबी खोऱ्यात याटुंगमध्ये डोकलाम परिसरात रस्ते बांधणीचं काम हाती घेतलं. त्यावेळी भारतानं त्याचा कडाडून विरोध केला. पण चीननं या विरोधाला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. म्हणून या भागावर लक्ष ठेवण्यासाठी भारतानं दोन बंकर उभारले. पण चिनी सैन्यानं भारताचे हे दोन्ही बंकर उद्ध्वस्त केली. त्यानंतर भारतीय लष्कराने आपली 'रिइनफोर्समेंट' म्हणजे लष्कराची एक मोठी तुकडी या भागात तैनात केली, त्यानंतर दोन्ही देशातील सैन्यात तणाव वाढला. भारताला धोक्याची घंटा भारतीय लष्कराच्या वरीष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जर चीनने वादग्रस्त डोकलाममध्ये रस्ते बांधणीचं काम सुरु ठेवलं, तर सामरिक दृष्टीकोनातून भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे. कारण हा भाग भारत-चीन आणि भूतानमधील 'ट्रायजंक्शन' तिन्ही देशांना जोडणारा मध्य भाग आहे. शिवाय, चीनकडून नव्यानं बांधणी करण्यात येणारा 'चिकननेक' (रस्ते बांधणी) पश्चिम बंगालपासून केवळ 42 किलोमीटर दूर आहे. शिवाय, यामुळे सिलीगुडी कॉरिडॉरमधील भारतीय मनुष्यवस्ती असलेल्या जवळपास 35 ते 40 किलोमीटरच्या भागावरही याचा परिणाम होऊ शकतो. विशेष म्हणजे, याच बाजूला नेपाळची सीमाही आहे. त्यामुळे युद्धजन्य परिस्थितीत चीनच्या या रस्त्याचा भारताला सर्वात मोठा धोका आहे. china-300x200 चीनचा डाव युद्धजन्य परिस्थितीत चीनला आपलं सैन्य सीमेवर तैनात करणं सोपं होणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत जर चीनचं सैन्य सीमेवर पोहचलं, तर भारताचा ईशान्य भाग गिळंकृत करेल. त्यामुळेच भारतानं चीनच्या रस्ते बांधणीच्या कामाला विरोध केला आहे. भूतानला गाजर दुसरीकडे डोकलाम शिवाय चीनच्या वायव्य भागातील 700 किमीच्या हद्दीवरुनही वाद सुरु आहे. पण डोकलाम आणि सिक्किम गिळंकृत करण्यासाठी चीनने भूतानला डोकलामच्या बदल्यात वायव्येकडील भूभाग सोडण्याचं गाजर दाखवलंय. पण भारत-भूतानचे संबंध चांगले असल्यानं भूताननं चीनच्या प्रस्तावाला नकार दिला आहे. भारत-भूतान संबंध कारण, एकतर भूतान एक प्रोटेक्टिव्ह (रक्षित) देश असून, त्याच्या रक्षणाची जबाबदारी भारतावर आहे. यासाठी 2007 मध्ये भारत आणि भूतानमध्ये राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात करार झाला आहे. या करारान्वये, भूतानच्या सैन्याला भारतीय लष्कर प्रशिक्षण देत आहे. भारताकडून होजांग परिसरात यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरु केलंय. 'इंडियन मिलिट्री ट्रेनिंग टीम' नावाची भारतीय लष्कराची एक तुकडी भूतानच्या लष्कराला प्रशिक्षण देत आहे. पण यावरुनही चीनने भारतावर आगपाखड केली आहे. भूतान सैन्याला प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली भारतीय लष्कर चीनच्या सीमेवर पेट्रोलिंग करत असल्याचा आरोप चीनकडून होत आहे. पण चीनचे सर्व आरोप भारताने फेटाळून लावले आहेत. चीनकडून तिबेटमध्ये रेल्वे मार्ग उभारण्याची तयारी दुसरीकडे चीनकडून तिबेटची राजधानी ल्हासापासून याटूंगपर्यंत रेल्वे मार्ग उभारला जात आहे. त्यामुळे हे रस्ते बांधणीचं काम पूर्ण झाल्यानंतर भारत-चीन आणि भूतानच्या 'ट्रायजंक्शन'पर्यंत रेल्वे मार्ग उभारुन, भारताला कोंडीत पकडण्याचा चीनचा डाव आहे. लष्करप्रमुख बिपिन रावत यांचा सिक्किम दौरा दरम्यान, भारत-चीन लष्करामधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सिक्किमचा दौरा केला. यावेळी त्यांनी भारतीय लष्कराच्या फॉरेमेशन हेडक्वॉर्टरमध्ये जवान आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चीनमधील हालचालींवर चर्चा केली. पण भारत-चीन वादानंतर चीनने कैलास मानसरोवर यात्रेतील चीनची हद्द बंद केली आहे. त्यामुळे मानसरोवर यात्रेला निघालेले यात्रेकरुन सिक्किमच्या गंगटोकमध्ये थांबून आहेत. चीनच्या उलट्याबोंबा दुसरीकडे, सोमवारी चीनच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने पुन्हा एकदा 1959 मध्ये तत्कालिन पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंनी सिक्किमप्रश्नी लिहलेल्या पत्राचा दाखला देऊन, भारतावर घुसखोरीचा आरोप केला. पण चिनी प्रवक्त्याने या पत्रातील अक्साई चीनवर जे भाष्ट केलं, त्यातील मुख्य विषयालाच बगल दिली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uttarakhand Avalanche : उत्तराखंड हिमस्खलनात 50 मजुरांना बाहेर काढले, 4 जणांचा मृत्यू, पाच जणांचा अजूनही शोध सुरू; जखमींच्या डोक्याला गंभीर इजा
उत्तराखंड हिमस्खलनात 50 मजुरांना बाहेर काढले, 4 जणांचा मृत्यू, पाच जणांचा अजूनही शोध सुरू; जखमींच्या डोक्याला गंभीर इजा
... तर मढी गावाने जो निर्णय घेतलाय तो भविष्यात महाराष्ट्रभर घेतला जाईल; मंत्री नितेश राणेंचा बीडीओंनाही इशारा
... तर मढी गावाने जो निर्णय घेतलाय तो भविष्यात महाराष्ट्रभर घेतला जाईल; मंत्री नितेश राणेंचा बीडीओंनाही इशारा
युक्रेन-रशिया युद्धावरून झेलेन्स्की आणि ट्रम्प भिडले असतानाच तिकडं एक युद्ध तरी थांबलं! हत्यारे ठेवली, वेगळ्या देशाच्या मागणीने गेल्या 40 वर्षात 40 हजार जणांचा जीव गेला
युक्रेन-रशिया युद्धावरून झेलेन्स्की आणि ट्रम्प भिडले असतानाच तिकडं एक युद्ध तरी थांबलं! हत्यारे ठेवली, वेगळ्या देशाच्या मागणीने गेल्या 40 वर्षात 40 हजार जणांचा जीव गेला
इकडं इंद्रजित सावंतांना धमकी देताच माझा आवाज नाही म्हणणारा प्रशांत कोरटकर फरार अन् तिकडं कुटुंबीय म्हणाले, धमक्या मिळाल्या, पण पोलिस तक्रारीत उल्लेखच नाही!
इकडं इंद्रजित सावंतांना धमकी देताच माझा आवाज नाही म्हणणारा प्रशांत कोरटकर फरार अन् तिकडं कुटुंबीय म्हणाले, धमक्या मिळाल्या, पण पोलिस तक्रारीत उल्लेखच नाही!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8 PM TOP Headlines 8PM 01 March 2025Job Majha : PM इंटर्नशिप योजनेअंतर्गत विविध पदांकरिता इंटर्नशिप : 1 March 2025 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 01 March 2025Maharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha | 01 March 2025 7 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uttarakhand Avalanche : उत्तराखंड हिमस्खलनात 50 मजुरांना बाहेर काढले, 4 जणांचा मृत्यू, पाच जणांचा अजूनही शोध सुरू; जखमींच्या डोक्याला गंभीर इजा
उत्तराखंड हिमस्खलनात 50 मजुरांना बाहेर काढले, 4 जणांचा मृत्यू, पाच जणांचा अजूनही शोध सुरू; जखमींच्या डोक्याला गंभीर इजा
... तर मढी गावाने जो निर्णय घेतलाय तो भविष्यात महाराष्ट्रभर घेतला जाईल; मंत्री नितेश राणेंचा बीडीओंनाही इशारा
... तर मढी गावाने जो निर्णय घेतलाय तो भविष्यात महाराष्ट्रभर घेतला जाईल; मंत्री नितेश राणेंचा बीडीओंनाही इशारा
युक्रेन-रशिया युद्धावरून झेलेन्स्की आणि ट्रम्प भिडले असतानाच तिकडं एक युद्ध तरी थांबलं! हत्यारे ठेवली, वेगळ्या देशाच्या मागणीने गेल्या 40 वर्षात 40 हजार जणांचा जीव गेला
युक्रेन-रशिया युद्धावरून झेलेन्स्की आणि ट्रम्प भिडले असतानाच तिकडं एक युद्ध तरी थांबलं! हत्यारे ठेवली, वेगळ्या देशाच्या मागणीने गेल्या 40 वर्षात 40 हजार जणांचा जीव गेला
इकडं इंद्रजित सावंतांना धमकी देताच माझा आवाज नाही म्हणणारा प्रशांत कोरटकर फरार अन् तिकडं कुटुंबीय म्हणाले, धमक्या मिळाल्या, पण पोलिस तक्रारीत उल्लेखच नाही!
इकडं इंद्रजित सावंतांना धमकी देताच माझा आवाज नाही म्हणणारा प्रशांत कोरटकर फरार अन् तिकडं कुटुंबीय म्हणाले, धमक्या मिळाल्या, पण पोलिस तक्रारीत उल्लेखच नाही!
बायकोचा प्रियकरासोबत राहण्यासाठी तगादा, TCS मॅनेजरनं लाईव्ह व्हिडिओ करत आयुष्य संपवलं; आता बायको व्हिडिओ रिलीज करत म्हणाली, 'तो माझा प्रियकर होता, पण...'
बायकोचा प्रियकरासोबत राहण्यासाठी तगादा, TCS मॅनेजरनं लाईव्ह व्हिडिओ करत आयुष्य संपवलं; आता बायको व्हिडिओ रिलीज करत म्हणाली, 'तो माझा प्रियकर होता, पण...'
हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे 600 रस्ते बंद, 2300 हून अधिक ट्रान्सफॉर्मर ठप्प; जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे नद्यांची पातळी 3-4 फुटांनी वाढली!
हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे 600 रस्ते बंद, 2300 हून अधिक ट्रान्सफॉर्मर ठप्प; जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे नद्यांची पातळी 3-4 फुटांनी वाढली!
Santosh Deshmukh Case : अशी कडक शिक्षा करा की गुन्हेगारांमध्ये दहशतच निर्माण झाली पाहिजे; संतोष देशमुख प्रकरणावरून बाळासाहेब थोरात संतापले
अशी कडक शिक्षा करा की गुन्हेगारांमध्ये दहशतच निर्माण झाली पाहिजे; संतोष देशमुख प्रकरणावरून बाळासाहेब थोरात संतापले
Anjali Damania on Dhananjay Munde : सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू; अंजली दमानियांचा जाहीर इशारा
सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू; अंजली दमानियांचा जाहीर इशारा
Embed widget