Imran Khan Arrest: अटक बेकायदेशीर, इम्रान खान यांना तातडीने सोडा, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
Imran Khan Arrest: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर ठरवत त्यांना तातडीने सोडण्याचे आदेश पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
Imran Khan Arrest: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांची अटक बेकायदेशीर असून त्यांना तातडीने सोडा असा आदेश पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेसंदर्भात गुरुवारी 11 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायाधीश उमर अता बंदियाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सुनावणीवर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीशांनी इम्रान खान यांना अटक केल्यानंतर एनएबीला चांगलेच फटकारले होते. तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी करण्यात आली. यावेळी मुख्य न्यायाधीश उमर अता बंदियाल यांनी इम्रान यांना इस्लामाबाद न्यायालयाच्या परिसरातून अटक करण्यावर प्रश्न उपस्थित केला होता. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने (SC) गुरुवारी नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोला (NAB) पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांना तासाभरात न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले. न्यायालयात हजर राहिल्यानंतर सरन्यायाधीशांनी पीटीआय प्रमुखांच्या सुटकेचे आदेश जारी केले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचे खडेबोल
सरन्यायाधीश उमर अता बंदियाल म्हणाले की, 'न्यायालय या प्रकरणावर खूप गंभीर आहे. या प्रकरणी न्यायालय आजच योग्य तो आदेश जारी करणार आहे' . सरन्यायाधीश बंदियाल म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला न्यायालयाच्या परिसरातून कशी काय अटक केली जाऊ शकते? न्यायालयाची एक प्रतिष्ठा असते. इम्रान खान यांच्या अटकेनंतर न्यायालयात कोणालाही सुरक्षित वाटणार नाही. न्यायालयाच्या आवारात अटक करणे ही एक धोकादायक प्रवृत्ती आहे. हे थांबवले पाहिजे.' असेदेखील न्यामूर्तींचे खंडपीठ म्हणाले.
न्यायालयाच्या या भूमिकेमुळे इम्रान खान यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तण्यात आली होती. यानंतर इम्रान खान यांचे समर्थक चांगलेच खूश झाले. इम्रान खान यांनी आपल्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. इम्रान खान यांची अटक कायदेशीर ठरवण्याऱ्या इस्लामाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्याच्या याचिकेविरोधात पीटीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती.
Pakistan Tehreek-e-Insaf's (PTI) Chairman Imran Khan's arrest has been declared “illegal” by Supreme Court which also ordered that he be released "immediately". He has been ordered to appear in Islamabad High Court tomorrow, reports Pakistan media ARY NEWS and Geo TV pic.twitter.com/edbViBlHd8
— ANI (@ANI) May 11, 2023
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Italy Milan Blast: इटली: मिलानमध्ये कारमध्ये भीषण स्फोट, अनेक वाहने जळून खाक