Cidco Lottery 2025 : सिडकोच्या घरासाठी बुकिंग शुल्क भरलेल्या प्रत्येकाला घर मिळणार? 26 हजार घरांसाठी किती अर्ज, आकडेवारी समोर
Cidco Mass Housing Scheme : सिडको महागृहनिर्माण योजनेतील माझे पसंतीचे सिडकोचे घर यातून विक्री होणाऱ्या 26000 घरांसाठी 22000 अर्ज आले आहेत.

नवी मुंबई: शहर व औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोने माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेद्वारे 26502 घरांच्या विक्रीचे नियोजन केलं होतं. या घरांसाठी फक्त 22000 अर्ज आले आहेत.म्हणजेच फक्त 22000 अर्जदारांनी बुकिंग शुल्क भरलं आहे.नवी मुंबईतील विविध भागातील सिडकोच्या घरांच्या किमती आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील अर्जदारांसाठी 25 लाखांपासून सुरू होतात तर अल्प उत्पन्न गटातील सर्वाधिक किंमती घर 97 लाख रुपयांचे आहे.
सिडकोने ऑक्टोबर महिन्यामध्ये माझे पसंतीचे सिडकोचे घर योजना आणली होती. यासाठी अर्ज करण्यास अनेकदा मुदतवाढ देण्यात आली. नवी मुंबई शहर व औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडको यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेद्वारे 26502 घरांच्या विक्रीसाठी अर्ज मागवले होते.
वारंवार मुदतवाढ देऊन आणि मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी करून देखील सिडकोच्या माझे पसंतीचे घर या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. विक्रीसाठी काढलेल्या घरांपेक्षा अर्जदारांनी बुकिंग शुल्क जमा केलं आहे. सिडकोनं पहिली मसुदा यादी वेबसाईटवर प्रकाशित केली आहे. त्यातून अर्जदारांची संख्या समोर आली आहे.
खरंतर सिडको कडून परवडणाऱ्या घरांच्या विक्रीसाठी माझे पसंतीचे सिडकोचे घर योजना आणली गेली होती.वाशी, तळोजा, पनवेल, खारघर, उलवे, खांदेश्वर या भागातील घरांच्या विक्रीसाठी योजना आणली गेली होती. सिडकोची ही घरं रेल्वे स्टेशनजवळ आहेत.
सिडकोनं 26502 घरांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी बुकिंग शुल्क आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील अर्जदारांना 75 हजार रुपये, अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांना 1 बीएचके घरासाठी 1 लाख 50 हजार तर 2 बीएचके घरासाठी 2 लाख रुपये बुकिंग शुल्क जमा करायचं होतं.
सिडकोनं माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेच्या प्रसिद्धीसाठी प्रयत्न केले होते. मात्र, अपेक्षित प्रतिसाद या योजनेला मिळालेला दिसून येत नाही. पाच वेळा मुदतवाढ आणि प्रचार प्रसार करुन केवळ 22000 अर्जदारांनी बुकिंग शुल्क जमा केलं आहे.
सिडकोडकडून मसुदा यादी प्रकाशित
सिडकोनं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार मसुदा यादी प्रकाशित करण्यात आली आहे. सिडकोनं 3 फेब्रुवारी म्हणजेच काल मसुदा यादी प्रकाशित केली आहे. आता अंतिम यादी 10 फेब्रुवारी रोजी प्रकाशित केली जाईल. त्यानंतर सोडत 15 फेब्रुवारी रोजी काढण्यात येईल.
सिडकोच्या घरांच्या किमती (रुपयांमध्ये):
गट EWS ( आर्थिक दुर्बल घटक )
तळोजा सेक्टर 28 - 25.1 लाख
तळोजा सेक्टर 39 -26. 1 लाख
खारघर बस डेपो - 48. 3 लाख
बामणडोंगरी -31. 9 लाख
खारकोपर 2A, 2B -38.6 लाख
कळंबोली बस डेपो - 41.9 लाख
अल्प उत्पन्न गट (एलआयजी) -
पनवेल बस टर्मिनस - 45.1 लाख
खारघर बस टर्मिनस- 48.3 लाख
तळोजा सेक्टर 37 - 34.2 लाख 46.4 लाख
मानसरोवर रेल्वे स्टेशन -41.9 लाख
खांदेश्वर रेल्वे स्टेशन -46.7 लाख
खारकोपर ईस्ट - 40.3 लाख
वाशी ट्रक टर्मिनल - 74.1 लाख
खारघर स्टेशन सेक्टर वन A- 97.2 लाख
इतर बातम्या :
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...

























