Italy Milan Blast: इटली: मिलानमध्ये कारमध्ये भीषण स्फोट, अनेक वाहने जळून खाक
Milan Blast: इटलीमधील मिलान शहरात कारमध्ये तीव्र स्फोट झाला. यामध्ये एकजण जखमी झाला आहे.
Italy Milan Blast: इटलीमधील मिलानमधील शहरात मोठा स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका तीव्र होता की काही कारदेखील आगीत जळून खाक झाल्या. आगीमुळे धुराचे लोळ उठले होते. हे लोळ दूर अंतराहूनही दिसत होते. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारमध्ये हा स्फोट झाला असल्याची माहिती आहे. या घटनेत एक जण जखमी झाला असून अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.
इटलीतील वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट मिलानमधील पोर्टा रोमाना भागात झाला. सुरुवातीला झालेल्या स्फोट कमी तीव्रतेचा झाला. त्यानंतर स्फोटाची तीव्रता वाढू लागली. प्राथमिक माहितीनुसार, 5 कारचे मोठे नुकसान झाले आहे.
An explosion occurred in the center of Milan, cars are on fire.
— 301 Military (@301military) May 11, 2023
According to preliminary information, a parked van exploded. pic.twitter.com/gSIBAYQZBu
BREAKING VIDEO: SEVERAL VEHICLES ON FIRE AFTER LARGE EXPLOSION IN MILAN ITALY pic.twitter.com/dVmJXHCVLr
— GenAbSILKY 🇵🇹🇨🇦🇲🇾🇦🇮🇲🇩🇳🇮🇾🇹 (@GenAb70261840) May 11, 2023
ज्या व्हॅनमध्ये धमाका झाला, त्या व्हॅनमध्ये ऑक्सिजन सिलेंडर ठेवले होते.त्यामुळेच सुरुवातीला लहान तीव्रतेच्या स्फोटाने भीषण स्वरुप धारण केले.