एक्स्प्लोर
Advertisement
माझं नाव दहशतवाद्यांच्या यादीतून हटवा, हाफिज सईदची UN कडे मागणी
मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदने संयुक्त राष्ट्रात धाव घेतली आहे. संयुक्त राष्ट्रात एक याचिका दाखल करुन, आपलं नाव दहशतवाद्यांच्या यादीतून वगळावे, अशी मागणी केली आहे.
न्यूयॉर्क : मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदने संयुक्त राष्ट्रात धाव घेतली आहे. संयुक्त राष्ट्रात एक याचिका दाखल करुन, आपलं नाव दहशतवाद्यांच्या यादीतून वगळावे, अशी मागणी केली आहे.
सईदने आपल्या लाहोरमधील मिर्जा अॅण्ड मिर्जा कंपनीद्वारे ही याचिका संयुक्त राष्ट्रात दाखल केली आहे. हाफिजने ही याचिका नजरकैदेत असताना दाखल केली असल्याचं वृत्त आहे.
26/11 ला 9 वर्षे पूर्ण, हल्ल्याचा मास्टरमाईंड अजूनही मोकाट
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर 2008 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतील अध्यादेशाद्वारे हाफीजचं नाव दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलं. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या मते, 10 डिसेंबर 2008 रोजी हाफिज मोहम्मद सईदचं नाव अध्यादेश क्रमांक 1822 (2008) च्या पहिल्या आणि दुसऱ्या उताऱ्याद्वारे समाविष्ट करण्यात आलं.
हाफिज सईदवर पाकिस्तान मेहरबान, नजरकैदेतून मुक्तता
या यादीत त्याचे नाव समाविष्ठ करताना, लष्कर-ए-तोयबा आणि अल-कायदाशी संपर्क ठेवणं, या दोन्ही संघटनांना फंडिंग, प्लॅनिंग आणि त्यांच्या तयारीमध्ये मदत करणे, यासाठी त्याच्या नावाचा समावेश करण्यात आला.
26/11 च्या नऊ वर्षपूर्तीनिमित्त हाफिज सईद PoK ला जाणार
दरम्यान, पाकिस्तानने हाफिज सईदची 24 नोव्हेंबर रोजी नजरकैदेतून मुक्तता करण्यामुळे अमेरिकेने चांगलंच झापलं. अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते हेथर नॉर्ट यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, पाकिस्तानने लवकरात लवकर त्याला (हाफिज सईदला) अटक करावी. आणि त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा करावी, अशी मागणी केली आहे.
हाफिज सईदला तातडीने अटक करा, अमेरिकेने पाकला खडसावलं
“लष्कर-ए-तोयबा एक दहशतवादी संघटना आहे. या संघटनेने अनेक दहशतवादी हल्ल्याद्वारे शेकडो निष्पापांची बळी घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानने त्याला अटक करुन, त्याच्या गुन्ह्यांची त्याला शिक्षा द्यावी,” अशी प्रतिक्रिया हेथर नॉर्ट यांनी दिली आहे.
हाफिज सईदला जानेवारी 2017 पासून पाकिस्तानात नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. पण शुक्रवारी नजरकैदेत ठेवण्याची मुदत संपल्याने त्याची सुटका करण्यात आली.
संबंधित बातम्या
'हाफिजच्या खात्म्यासाठी परदेशी यंत्रणांकडून 8 कोटीची सुपारी'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बीड
राजकारण
Advertisement