एक्स्प्लोर
बर्लिन ख्रिसमस मार्केट हल्ला : संशयित हल्लेखोर पाकिस्तानी वंशाचा
बर्लिन : जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये एका ट्रकखाली चिरडून 12 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. या घटनेतील हल्लेखोर पाकिस्तानी वंशाचा 23 वर्षीय तरुण असल्याची माहिती मिळते आहे. नाताळच्या निमित्ताने गजबजलेल्या बाजारपेठेत ट्रक घुसवल्याने ट्रकखाली चिरडून 12 निष्पापांचा जीव गेला.
संशयित हल्लेखोर फेब्रुवारीमध्ये जर्मनीत आला होता. त्यानंतर त्याच्याविरोधात पोलिसात लहान-मोठ्या गुन्ह्यांप्रकरणी तक्रारी दाखल असल्याचीही माहिती मिळते आहे. निर्वासितांच्या हॉस्टेलमध्ये संशयित हल्लेखोर राहत होता.
या घटनेमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून 48 जण जखमी आहेत. ट्रकचालकाच्या वर्णनाशी साधर्म्य असलेल्या एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. ट्रकमध्ये पोलिश वंशाच्या नागरिकाचं ड्रायव्हिंग लायसन्स असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे.
जर्मनीच्या चॅन्सलर अँजेल मार्केल यांनी गेल्या वर्षी 10 लाख स्थलांतरितांसाठी दरवाजे उघड करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्याविरोधात हे पाऊल उचललं असल्याची शक्यता आहे.
या घटनेमुळे जुलै महिन्यात फ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. आयएसने घडवलेल्या घातपातात फ्रान्सच्या नाईस शहरात 86 जणांचा मृत्यू झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement