Trending News : 'या' प्रसिद्ध यूट्यूबरने 42 सेकंदात 1.75 कोटी कमावले, 'ही' नवीन पद्धत स्वीकारली
Viral News : एका यूट्यूबरने अवघ्या 42 सेकंदात एक कोटी 75 लाख रुपये कमावले आहेत. YouTuber ने NFT जारी करून ही कमाई केली आहे.
YouTuber Viral News : आजकाल लोक यू ट्यूबवर (YouTube) कंटेंट टाकून लाखोंची कमाई करत आहेत. असाच एक YouTuber सध्या खूप चर्चेत आहे. जोनाथन मा असे या प्रसिद्ध यूट्यूबरचे नाव आहे. जोनाथन मा सध्या यूट्यूबवर केलेल्या कमाईमुळे खूप चर्चेत आहेत. जोनाथनचे Jonah Tech नावाचे YouTube चॅनेल आहे ज्यावर तो कंटेंट टाकतो. जोनाथनने अवघ्या 42 सेकंदात एक कोटी 75 लाख रुपये कमावले आहेत. त्याला एकूण 1 कोटी 40 लाख रुपये मिळाले आहेत. आता इतक्या कमी वेळात इतकी मोठी कमाई कशी शक्य आहे? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
यूट्यूबरने 42 सेकंदात 1.75 लाख कमावले
जोनाथन मा एक प्रसिद्ध यूट्यूबर आहे. अलीकडे तो त्याच्या कमाईमुळे खूप चर्चेत आला आहे. बिझनेस इनसाईडरच्या रिपोर्ट्सनुसार, YouTuber ने चित्रपट निर्माता बनण्यासाठी त्याचे NFT कलेक्शन रिलीज केले आहे. जोनाथन मा कॉम्युटर प्रोग्रामिंग, क्रिप्टो आणि तंत्रज्ञानाशी संबंधित YouTube वर व्हिडिओ बनवतो. याआधी त्याने फेसबुक आणि गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणूनही काम केले आहे. त्याला चित्रपट निर्माता बनायचे आहे. त्याच्या यूट्यूबवर 16 लाखांहून अधिक सब्सक्रायबर आहेत. YouTube ने NFT कलेक्शनसाठी Discord सर्व्हर तयार केला आहे. एक सर्व्हर जेथे फक्त समान सर्व्हर असलेले लोक त्यांचे NFT कलेक्शन पाहू शकतील. जोनाथनचा NFT आहे तो खाजगी डिस्कॉर्ड (private server) वर पाहण्यास सक्षम असेल.
NFT कलेक्शन रिलीज करून कमाई केली
जोनाथन मा यांनी त्यांचा "वॅक्स्ड डॉगॉस" (''Vaxxed Doggos'') हे कलेक्शन प्रसिद्ध केले आहे. याद्वारे त्याने अवघ्या 42 सेकंदात एक कोटी 75 लाख रुपये कमावले आहेत. त्याला एकूण एक कोटी 40 लाख रुपये मिळाले आहेत. NFT (Non Fungible Token) ही एक डिजिटल वस्तू आहे जी ब्लॉक चेन तंत्रज्ञान वापरून खरेदी आणि विकली जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या :
- VIDEO : जिगरबाज...! प्रचंड तुफानात विमानाचं लॅण्डिंग केलं; भारतीय पायलटचं होतंय कौतुक, व्हिडीओ व्हायरल
- Corona Test : कोरोना चाचणी नको रे बाबा! ‘या’ कारणामुळे रशियात बड्या नेत्यांना कोरोना चाचणीची धास्ती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha