VIDEO : जिगरबाज...! प्रचंड तुफानात विमानाचं लॅण्डिंग केलं; भारतीय पायलटचं होतंय कौतुक, व्हिडीओ व्हायरल
Viral Video : ब्रिटनमध्ये जोरदार वाऱ्यामुळे मजबू असलेली विमानेही अडकून पडली आहेत. पण या आव्हानात्मक परिस्थितीत एका भारतीय पायलटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Viral Video : ब्रिटन सध्या गेल्या तीस वर्षांतील सर्वात मोठ्या वादळाचा सामना करत आहे. Eunice वादळ ब्रिटनमध्ये जेव्हापासून आले आहे, तेव्हापासून सगळीकडे परिस्थिती अनियंत्रित झाली आहे. अशावेळी लंडनमधील हिथ्रो विमानतळावर विमानांचे लँडिंग करणेही कठीण झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे मजबू असलेली विमानेही अडकून पडली आहेत. पण या आव्हानात्मक परिस्थितीत एका भारतीय पायलटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या धोकादायक Eunice वादळात एअर इंडियाच्या विमानाने एवढं नेत्रदीपक लँडिंग केलं आहे की, प्रत्येकजण त्या विमानाच्या पायलटचं कौतुक करत नाही. व्हायरल व्हिडीओमध्येही बिग जेट टीव्हीचे संस्थापक जेरी डायर्स ( Jerry Dyers) म्हणत आहेत की, हे विमान व्यवस्थितपणे उतरू शकेल की नाही हे मला पाहायचे आहे. हा अत्यंत कुशल भारतीय वैमानिक आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असून, त्या पायलटचं मोठं कौतुक केले जात आहे.
"Very skilled Indian Pilot" 👨✈️👏
— BiTANKO BiSWAS (@Bitanko_Biswas) February 19, 2022
Pilots of this Air India flight managed to land their B787 Dreamliner aircraft with ease into London Heathrow yesterday afternoon in its first attempt even as Storm Eunice left hundreds of flights delayed, cancelled or diverted...
Jai Hind!🇮🇳 pic.twitter.com/94FrTnTUiy
व्हिडिओ शेअर करत एका यूझरने लिहिले आहे की, तो खूप कुशल पायलट आहे. एअर इंडियाच्या पायलटने B787 Dreamliner विमान हिथ्रो विमानतळावर यशस्वीरित्या उतरवले आहे. इतर अनेक विमाने उतरू शकत नसताना अनेक उड्डाणे रद्द करावी लागली तेव्हा या जिगरबाज वैमानिकानं कमाल केली आहे.
या वादळादरम्यान भारतातून एक नव्हे तर दोन विमानांनी हिथ्रो विमानतळावर यशस्वी लँडिंग केले. एक AI147 हे हैदराबादहून आले होते, तर दुसरे AI145 गोव्याहून आले होते. दोन्ही विमानांनी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी लँडिंग केले. माहिती अशी मिळाली आहे की, AI147 विमानाचे नेतृत्व कॅप्टन अंचित भारद्वाज यांनी केले होते, तर AI145 विमानाचे नेतृत्व कॅप्टन आदित्य राव यांनी केले होते.