Corona Test : कोरोना चाचणी नको रे बाबा! ‘या’ कारणामुळे रशियात बड्या नेत्यांना कोरोना चाचणीची धास्ती
एका संगमरवरी टेबलावर तब्बल 20 फूट अंतर ठेवून बसणाऱ्या या नेत्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. एवढ्या लांबलचक टेबलबद्दल सोशल मीडियावर अनेक मीम्सही बनले आहेत.
Corona Test In Russia : युक्रेन संघर्षाच्या (Ukraine crisis) काळात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (France President Emmanuel Macron) आणि जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ (German Chancellor Olaf Scholz) यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांच्यासोबतची भेट चर्चेचा विषय बनली आहे. या भेटीत तिन्ही नेत्यांमध्ये किती अंतर दिसले, याकडे जनतेचे लक्ष लागले होते. एका संगमरवरी टेबलावर तब्बल 20 फूट अंतर ठेवून बसणाऱ्या या नेत्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. एवढ्या लांबलचक टेबलबद्दल सोशल मीडियावर अनेक मीम्सही बनले आहेत.
मॅक्रॉन आणि ओलाफ यांची रशियन डॉक्टरांकडून कोविड चाचणी न होणे, हे दोन नेत्यांमधील अंतराचे एक मोठे कारण आहे. कोरोना चाचणीच्या माध्यमातून आपला डीएनए तर चोरला जाणार नाही ना, अशी भीती त्यांना होती.
कोरोना चाचणीला विरोध नाही, पण...
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन गेल्या आठवड्यात रशियाच्या युक्रेनच्या संघर्षादरम्यान चर्चेसाठी मॉस्कोला गेले होते. जर्मन चांसलर यांनी मंगळवारी पुतीन यांची भेट घेतली. रशियामध्ये दोघांचीही कोरोना चाचणी झाली नाही. ते कोरोना चाचणीच्या विरोधात होते, असे नाही. पण, त्यांना त्यांचे नमुने रशियन डॉक्टरांना द्यायचे नव्हते. विशेष म्हणजे जागतिक राजकारणातील बड्या नेत्यांना अशी कोणतीही माहिती इतर कोणत्याही देशाला द्यायची नसते, ज्याचा त्यांच्याकडून फायदा घेतला जाईल.
डीएनएमधून मिळते संपूर्ण कुंडली!
आपल्या शरीरात अनेक कोट्यवधी पेशी असतात. लाल रक्तपेशी वगळता, इतर सर्व पेशींमध्ये अनुवांशिक कोडिंग असते ज्यामुळे शरीर बनते. ‘डीएनए’ ही एक शिडीसारखी रचना आहे, ज्यामध्ये मानवी शरीराची कुंडली दडलेली आहे. डीएनएच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीची संपूर्ण माहिती, त्याचा स्वभाव, त्याचे गुण आणि दोष, त्याचे अनुवांशिक रोग, त्याचे वंश इत्यादी शोधता येतात.
होऊ शकतो राजकीय फायदा!
नेत्याच्या डीएनएवरून राजकीय फायदा कसा घेतला जाऊ शकतो? यावर तज्ज्ञांचे एकमत नाही. या प्रकरणात, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, डीएनएपासून एखाद्या व्यक्तीचे क्लोनिंग आतापर्यंत केवळ चित्रपटांमध्येच दाखवले गेले आहे. परंतु, याद्वारे हे शोधले जाऊ शकते की, एखाद्या व्यक्तीला किती आणि कोणते आजार आहेत. या सर्व गोष्टी एखाद्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. याआधीही वैयक्तिक माहिती लीक करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्याच्या प्रयत्नांमुळे रशियाचे नाव खराब झाले आहे.
हेही वाचा :
- Ukraine-Russia Conflicts : युक्रेन भोवतीचे रशियन सैन्य मागे परतले, रशियन संरक्षण मंत्रालयाची माहिती
- पुतीन यांच्याशी चर्चा नाही, काही दिवसांत रशिया युक्रेनवर हल्ला करणार, अमेरिकेचा दावा
- Ukraine-Russia Tension : युक्रेनमध्ये स्फोट, गॅस पाइपलाइनला आग; पुन्हा तणाव वाढला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha