एक्स्प्लोर
साप आढळल्याने विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

मेक्सिको : उडत्या विमानात साप आढळल्याचा अजब प्रकार अमेरिकेतील मेक्सिकोत घडला आहे. या प्रकारानंतर विमानाचं तत्काळ लँडिंग करण्यात आलं. टोरेऑनवरून मॅक्सिकोला आलेल्या विमानात रविवारी हा प्रकार घडला.
सामान ठेवण्याच्या जागेत हा साप आढळून आला आणि त्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यामुळे विमानाचं मेक्सिकोत तत्काळ लँडिंग करण्यात आलं. विमानात साप नेमका घुसलाच कसा, याचा तपास सध्या केला जातोय.
दरम्यान या अजब घटनेनंतर प्रवासी चांगलेच बिथरले. तत्काळ लँडिंग केल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास घेतला. विमानात साप निघण्याचा हा कदाचित पहिलाच प्रकार आहे.
पाहा व्हिडिओ :
दरम्यान या अजब घटनेनंतर प्रवासी चांगलेच बिथरले. तत्काळ लँडिंग केल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास घेतला. विमानात साप निघण्याचा हा कदाचित पहिलाच प्रकार आहे.
पाहा व्हिडिओ :
आणखी वाचा
Advertisement
Advertisement