Eiffel Tower : प्रसिद्ध आयफेल टॉवर बॉम्बने उडवण्याची धमकी, लोकांना बाहेर काढलं; बॉम्ब शोधक पथकाकडून सर्च ऑपरेशन
World News : आयफेल टॉवर बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने इमारतीतून लोकांना बाहेर काढण्यात आलं असून तेथे बॉम्ब शोधक पथकाकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे.
पॅरिस, फ्रान्स : फ्रान्सची (France) राजधानी पॅरिसमधीलप्रसिद्ध आयफेल टॉवर (Eiffel Tower) बॉम्बने उडवण्याची धमकी (Bomb Threat) मिळाल्याने एकच खळबळ माजली आहे. आयफेल टॉवर बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने इमारतीतून लोकांना बाहेर काढण्यात आलं असून तेथे बॉम्ब शोधक पथकाकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने आयफेल टॉवर शनिवारी बंद ठेवण्यात आलं होतं. तसेच नागरिक आणि पर्यटकांना या परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली. फ्रान्सच्या पोलिसांच्या सुत्रांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, आयफेल टॉवर बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याने येथून लोकांना बाहेर काढण्यात आलं.
आयफेल टॉवर बॉम्बने उडवण्याची धमकी
प्रसिद्ध आयफेल टॉवर बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली, यामुळे शनिवारी आयफेल टॉवरमधील तीन मजल्यांवरील नागरिकांना बाहेर काढण्यात आलं. पॅरिसमधील आयफेल टॉवर जगभरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. यामुळे येथे जगभरातील पर्यटक भेट देत असतात. दररोज हजारो देशी-विदेशी पर्यटक आयफेल टॉवर पाहण्यासाठी येत असतात.
पाहा व्हिडीओ :
PARIS
— Catholic Arena (@CatholicArena) August 12, 2023
Eiffel Tower evacuated due to BOMB threat pic.twitter.com/gioNTqGEzd
फ्रेंच पोलिसांनी दिली 'ही' माहिती
SETE या साइटच्या वृत्तानुसार, बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांनी सर्व मजल्यांवर शोध घेतला. यावेळी पोलिसांनी संशयास्पद दिसणाऱ्या पर्यटकांचीही चौकशी केली. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, फ्रेंच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्ब ठेवल्याचीची धमकी मिळताच सर्वांना सतर्क करण्यात आलं होतं. यासोबतच पर्यटनस्थळाच्या आसपास सुरक्षा वाढवण्यात आली आहे. खबरदारी म्हणून शनिवारी आयफेल टॉवर पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. तसेच आयफेल टॉवरला भेट देण्यासाठी आलेल्या सर्व पर्यटकांना बाहेर काढण्यात आलं.
बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला पाचारण
मीडिया रिपोर्टनुसार, आयफेल टॉवरमध्ये बॉम्ब असल्याची बातमी मिळताच बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला पाचारण करण्यात आलं. यासोबतच पोलिसांनी मिळून घटनास्थळी शोध मोहीम राबवली. यावेळी आयफेल टॉवर परिसरात बॅरिकेडिंग करून पोलिसांनी पर्यटकांना टॉवरपासून दूर राहण्यास सांगितलं होतं.
पर्यटकांमध्ये घबराटीचं वातावरण
मीडिया रिपोर्टनुसार, आयफेल टॉवरमध्ये बॉम्ब ठेवल्याची बातमी समोर येताच पर्यटकांमध्ये घबराटीचं वातावरण पाहायला मिळालं. धमकी मिळाल्यानंतर तीन मजल्यांवरील पर्यटकांना बाहेक काढून त्यांची चौकशी आणि परिसरात तपासणी करण्यात आली. जगातील सात आश्चर्यांमधील एक आयफेल टॉवर जगभरात प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षभरात सुमारे 62 लाख पर्यटकांनी येथे भेट दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Hawaii Wildfires : हवाई बेट आगीच्या भक्ष्यस्थानी! अमेरिकेच्या बेटावर जंगलात वणवा, भीषण आगीत 80 जणांचा मृत्यू तर शेकडो नागरिक बेपत्ता