एक्स्प्लोर
Coronavirus | जगभरात कोरोनाची सद्यस्थिती : जवळपास पावणेपाच लाख बाधित, 21 हजाराहून अधिक बळी
जगभरात कोरोना व्हायरसचा प्रकोप सुरु आहे. जगभरात जवळपास पावणेपाच लाख लोक कोरोनाबाधित झाले आहेत. तर 21 हजार 200 लोकांचा आतापर्यंत कोरोनाने बळी घेतला आहे.
मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. चीनमध्ये स्थिती आटोक्यात आली असली तरी इटली, स्पेन, अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जगभरात जवळपास पावणेपाच लाख लोक कोरोनाबाधित झाले आहेत. तर 21 हजार 200 लोकांचा आतापर्यंत कोरोनाने बळी घेतला आहे. तर दिलासादायक बाब अशी की, आतापर्यंत 1 लाख 15 हजार रुग्ण बरे झाले आहेत. तरी अजून जवळपास तीन लाख 33 हजार कोरोनाचे रुग्ण जगभरात आहेत. त्यातील चार टक्के म्हणजे जवळपास 14 हजार 733 जण गंभीर आहेत. गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 46 हजारांची तर बळींच्या आकड्यात 2306 ची भर पडली आहे.
इटलीत चीनपेक्षा दुप्पट बळी
कोरोनाने इटलीत चीन पेक्षा दुप्पट बळी घेतले आहेत. तर स्पेनने देखील चीनला मागे टाकलं आहे. इटलीत कोरोनामुले मृत्यूचं तांडव सुरुच आहे. एकाच दिवशी सहाशे पेक्षा जास्त माणसं दगावण्याचा कालचा सलग सहावा दिवस होता. इटलीतील एकूण बळींची संख्या साडे सात हजारावर गेली आहे. त्यातले साडे चार हजार मृत्यू उत्तर इटलीतील लोम्बार्डी प्रांतात झाले आहेत. काल रुग्णांच्या संख्येत साधारण पाच हजारांनी भर पडली, तिथे एकूण 75 हजार रुग्ण आहेत. सर्वात जास्त नुकसान झालेल्या लोम्बार्डी प्रांतात काल 296 लोकांनी जीव गमावला. त्या आधीच्या 24 तासात तिथला आकडा 402 होता.
गेल्या 6 दिवसात इटलीने गमावलेले जीव
20 मार्च – 627
21 मार्च - 793
22 मार्च – 651
23 मार्च – 601
24 मार्च – 753
25 मार्च - 683
इटलीमध्ये गेल्या सहा दिवसात 4108 मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत.
चीनमधील स्थिती
कोरोना व्हायरसची लागण चीनमधून सुरु झाली. चीन 81,285 लोक कोरोनाने बाधित झाले. त्यापैकी 3287 जणांचा मृत्यू झाला. चीनमध्ये काल 67 नवीन रुग्णांची भर पडली तर 6 लोक मृत्यूमुखी पडले.
स्पेनने चीनला मागे टाकलं
कोरोनाने स्पेनमध्ये देखील प्रकोप केला आहे. कोरोनामुळं बळींच्या बाबतीत स्पेनने चीनला मागे टाकलं. तिथे मृतांचा आकडा 3647 वर पोहोचला. गेल्या 24 तासात तब्बल 656 मृत्यूमुखी पडले आहेत. तर रुग्णांच्या संख्येत साडेसात हजारांची भर पडली. तिथे आता 50 हजार रुग्ण आहेत.
इराणमध्ये कोरोनामुळं 143 लोकांचा पुन्हा बळी गेला आहे. इराणमध्ये एकूण 2077 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. इराणमध्ये रुग्णांची संख्या 27 हजार आहे.
अमेरिकेत रुग्णांची संख्या वाढून 66 हजारांच्या वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात 164 बळी गेले आहेत. अमेरिकेत एकूण 944 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
फ्रान्समध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. 1331 लोकांचा बळी फ्रान्समध्ये गेला आहे. काल तिथे 213 लोकांनी जीव गमावला आहे. तिथं सध्या एकूण रुग्ण 25 हजारावर आहेत.
कोरोनामुळे बेल्जियममध्ये काल 56 मृत्यूमुखी पडले. इथल्या एकूण बळींचा आकडा 178 वर गेला आहे. कोरोनाने हॉलंडमध्ये काल 80 बळी घेतले तिथे एकूण 356 लोक दगावले आहेत, स्वित्झर्लंडमध्ये 153, इंग्लंडमध्ये 465 तर दक्षिण कोरियात 126 लोकांचा जीव घेतला आहे.
भारतात 21 दिवस लॉकडाऊन
कोरोनामुळे भारतात आतापर्यंत 11 बळी गेले आहेत. तर 606 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 43 जण कोरोनातून बरे झाले असल्याची माहिती आहे. दरम्यान भारत देश 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी घोषणा केली आहे.
संबंधित बातम्या :
पोलिसांनी आपल्या हातातील काठीला आता तेल लावून ठेवा : अनिल देशमुख
परिस्थितीचा कोणीही संधी म्हणून उपयोग करू नये : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
India lockdown : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली कोरानाची नवीन परिभाषा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement