एक्स्प्लोर

पोलिसांनी आपल्या हातातील काठीला आता तेल लावून ठेवा : अनिल देशमुख

वारंवार विनंती करुनही नियम मोडणाऱ्या नागरिकांवर आता प्रशासन कडक कारवाई करणार आहे. कारण, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तशा सूचना दिल्या आहेत.

मुंबई : पोलिसांनी आपल्या हातातील काठीला आता तेल लावून ठेवा, त्याशिवाय विनाकारण घराबाहेर पडणारी टोळकी शांत बसणार नाहीत, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्यात. विनाकारण बाहेर हिंडणाऱ्या लोकांना एकप्रकारे सज्जड दमच अनिल देशमुख यांनी दिला आहे. राज्यात जमावबंदी असतानाही लोक गर्दी करत आहेत. त्यामुळेच नाईलाजाने संचारबंदी जाहीर करण्यात आल्याची माहिती देखमुख यांनी दिली. मात्र, यापुढे नियम मोडणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचेही ते म्हणाले. कोरोना व्हायरसमुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी एबीपी माझाला विशेष मुलाखत दिली त्यावेळी ते बोलत होते. कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यातील 90 टक्के जनता आम्हाला सहकार्य करत आहे. मात्र, पाचदहा टक्के लोकांमुळे पोलिसांवर ताण येत आहे. अशा लोकांना आता परिस्थितीचं गांभीर्य दिसत नाही. त्यामुळे अशा लोकांना आता पोलीस वेगळ्या प्रकारे हाताळतील असा इशारा त्यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसह आरोग्यमंत्री राजेश टोपे वारंवार सांगत आहे. मात्र, ही पाचदहा टक्के लोक ऐकताना दिसत नाही. त्यामुळे अशा लोकांविरोधात आम्ही गंभीर कारवाई करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. परिस्थितीचा कोणीही संधी म्हणून उपयोग करू नये : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोलिसांनी आपल्या हातातील काठीला आता तेल लावून ठेवा राज्यात संचारबंदी असतानाही लोक विनाकारण बाहेर फिरत आहे. या लोकांमुळे कायदा सुव्यवस्था बिघडत चालली आहे. तुम्हाला अत्यावश्यक असेल तर तुम्ही जरुर बाहेर पडा. मात्र, आता नियमांचा भंग करणाऱ्या लोकांची गय केली जाणार नसल्याचा इशाराच अनिल देशमुख यांनी दिला आहे. यावेळी पोलिसांनी आपल्या काठ्यांना तेल लावून ठेवा आणि अशा लोकांवर कारवाई करण्याच्या सुचानाही त्यांनी दिल्या. दरम्यान, या परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्यांवरही कडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाबाधितांचा आकडा राज्यात शंभरीपार कोरोना व्हायरसचं संक्रमण झालेल्यांचा आकडा आता वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 107 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. यात मुंबईत सर्वाधिक 43 आहेत. तर, चार जणांचा मृत्यू झाला असून देशात आतापर्यंत 11 जणांचा यात बळी गेलाय. पिंपरी चिंचवड मनपा – 12 पुणे मनपा – 19 मुंबई शहर आणि उपनगर – 43 नागपूर – 4 यवतमाळ – 4 नवी मुंबई – 5 कल्याण – 4 अहमदनगर – 3 रायगड – 1 ठाणे – 2 पनवेल – 1 उल्हासनगर – 1 औरंगाबाद – 1 रत्नागिरी – 1 वसई-विरार – 1 Solapur Market Crowded | सोलापूरकरांना कोरोनाची भीतीच नाही! खबरदारी न बाळगता बाजारात झुंबड

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2026 | शनिवार

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

Embed widget