एक्स्प्लोर
'आधार' बायोमेट्रिक्स डेटाची CIA कडून चोरी, विकिलीक्सचा दावा
विकिलीक्सचा हा दावा भारत सरकारने तातडीने फेटाळला आहे.
नवी दिल्ली : आधार कार्डसाठी भारत सरकारने जमवलेला नागरिकांचा बायोमेट्रिक्स डेटा अमेरिकी गुप्तचर संस्था सीआयए चोरू शकते, असा गौप्यस्फोट विकिलीक्सने केलाय. भारत सरकारने हा दावा तातडीने फेटाळला आहे.
अमेरिकेची क्रॉसमॅच टेक्नॉलॉजीस ही कंपनी जगभरातल्या वेगवेगळ्या संस्थांना बायोमट्रिक्स डेटा कलेक्ट करण्याची साधने आणि तंत्रज्ञान पुरवते. भारत सरकारच्या आधार प्राधिकरणालाही याच कंपनीने बायमेट्रिक्स कलेक्ट करण्याचं तंत्रज्ञान पुरवलं आहे. ही कंपनी सीआयएसाठीही काम करते. त्यामुळे त्या कंपनीकडे असलेला आधार डेटा सीआयएकडून सहज अॅक्सेस केला जाऊ शकतो, असं विकिलीक्सने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.
https://twitter.com/wikileaks/status/900990454434598912
https://twitter.com/wikileaks/status/901148660163117060
विकीलीक्सचा हा दावा मात्र भारतीय अधिकाऱ्यांनी तातडीने फेटाळला आहे. आधार प्राधिकरणाने देशातील नागरिकांचा जमा केलेला आधार हा पूर्णपणे सुरक्षित आणि एनक्रीप्ट असून तो कुणालाही लीक करता येत नाही, असा दावाही आधार प्राधिकरणाने केला आहे.
अमेरिकेतील क्रॉस मॅच टेक्नॉलॉजी या कंपनीसाठी भारतात स्मार्ट आयडेंटिटी डिव्हाईसेस प्रा.लि. ही कंपनी काम करते. भारत सरकारने आधारसाठी बायोमेट्रिक्स जमा करण्यासाठी या स्मार्ट आयडेंटिटी डिव्हाईसेसकडूनच आवश्यक ती साधने आणि तंत्रज्ञान घेतलं आहे.
विकिलीक्सच्या ट्वीटर हँडलवर काल प्रकाशित झालेल्या ट्वीटवर सीआयने आधीच चोरलेल्या आधार बायोमेट्रिक्स डेटाचा गुप्तहेरीसाठी वापर केलाय का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर मिनीटभरातच आलेल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये सीआयएने आधीच आधार डेटा चोरल्याचा दावा ग्रेट गेम इंडिया या वेबसाईटवरील एका लेखाची लिंक एम्बेड करून करण्यात आला.
‘टाईम्स ऑफ इंडिया’तील वृत्तानुसार, विकिलीक्सचा ट्वीट प्रकाशित झाल्यानंतर जेव्हा आधार प्राधिकरणाशी या ट्वीटच्या सत्यासत्यतेबद्धल विचारणा करण्यात आली, तेव्हा ही माहिती म्हणजे विकिलीक्सचं 'लीक' नसून इंटरनेटवर असलेल्या लेखाची लिंक असल्याचं सांगण्यात आलं. तसंच आधारसाठी जमा करण्यात आलेला बायोमेट्रिक्स डेटा क्रॉस मॅच या अमेरिकेतील कंपनीकडे जात नसल्याचा दावा आधार प्राधिकरणाकडून करण्यात आला आहे.
क्रॉस मॅच ही कंपनी जगभरात अनेक देशांना बायोमेट्रिक्स जमा करण्याचं तंत्रज्ञान पुरवते, आधार प्राधिकरणालाही याच कंपनीने तंत्रज्ञान पुरवलं असलं तरी आधारसाठी जमा केलेला डेटा हा पूर्णपणे सुरक्षित असून तो आधार शिवाय अन्य कोणत्याही तिसऱ्या कंपनीला अॅक्सेस करता येत नाही, असाही दावा आधा प्राधिकरणाने केलाय.
ग्रेट गेम इंडिया ऑनलाईन या वेबसाईटवरील लेखात काहीही तथ्य नाही. त्यांच्या लेखाला कसलाही आधार नाही. केवळ क्रॉसमॅच ही कंपनी सीआयएलाही तंत्रज्ञान पुरवते या एकाच माहितीवरून संबंध लेखातील दाव्याचं तर्कट आधारीत असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.
अमेरिकी गुप्तचर संस्था सीआयएच्या अंतर्गत असलेल्या ओटीएस म्हणजे ऑफिस ऑफ टेक्निकल सर्विसेस अमेरिकेशी संबंधित जगभरातील सर्वांची बायोमेट्रिक्स माहिती जमा करत असते. हे ओटीएस क्रॉस मॅचकडून तंत्रज्ञान आणि साधने घेते. ग्रेट गेम इंडिया ऑनलाईनच्या लेखातील माहितीनुसार, जगभरातील नागरिकांची बायोमेट्रिक्स डेटा जमा करण्याच्या सीआयएच्या प्रोजेक्टला एक्स्प्रेस लेन प्रोजेक्ट असं नाव आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement