China Plane Crash : जाणूनबुजून करण्यात आला विमान अपघात; ब्लॅक बॉक्समधून माहिती उघड, 132 प्रवाशांचा झाला होता मृत्यू
China Plane Crash : चीनमध्ये मार्च महिन्यात एका विमान दुर्घटनेच्या तपासात हे विमान जाणूनबुजून क्रॅश करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या अपघातात 132 प्रवाशाचा मृत्यू झाला होता.
China Plane Crash : चीनमध्ये यावर्षी मार्च महिन्यामध्ये मोठ्या विमान अपघातात 32 प्रवाशाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता मोठी माहिती समोर येत आहे. 'वॉल स्ट्रीट जनरल' (The Wall Street Journal) या अमेरिकन वृत्तपत्रानुसार, दुर्घटनाग्रस्त चायना इस्टर्न विमानाला जाणूनबुजून क्रॅश करण्यात आलं. चीनमधील ग्वांगझूजवळ झालेल्या अपघातात चायना इस्टर्न 737-800 विमानातील सर्व 9 कर्मचारी आणि 123 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
'वॉल स्ट्रीट जनरल'च्या रिपोर्टनुसार, दुर्घटनाग्रस्त विमानाच्या अवशेषांमधून मिळालेल्या एका ब्लॅक बॉक्सच्या तपासात ही बाब उघड झाली आहे. या तपासात समोर आलं आहे की, कॉकपिटमधून कोणीतरी जाणूनबुजून विमानाचा अपघात घडवून आणला. याशिवाय प्राथमिक तपासात सहकार्य केलेल्या एका अमेरिकन अधिकाऱ्याने रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, त्यांना तपासादरम्यान विमानात कोणताही तांत्रिक बिघाड असल्याचे प्राथमिक तपासात आढळलं नाही. त्यानंतर क्रूच्या कामांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं.
Final seconds of #MU5735 pic.twitter.com/gCoMX1iMDL
— ChinaAviationReview (@ChinaAvReview) March 21, 2022
या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, विमानाने तीन मिनिटांत 29 हजार फूट उंचीवरून 9 हजार फूट उंची गाठली. यानंतर अवघ्या 20 सेकंदांनंतर विमान 3 हजार फूट उंचीवर होते. इतक्या उंचीवरून खाली येण्यासाठी 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो असंही रिपोर्ठमध्ये म्हटलं गेलं आहे. अशा परिस्थितीत विमानाच्या कॉकपिटमध्ये कोणीतरी जाणूनबुजून विमान वेगानं खाली पडण्यास भाग पाडत अपघात घडवून आणला. सध्या अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डानं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
मार्च महिन्यात कुओमिंगहून ग्वांगझूला जाणारे बोईंग 737-800 विमान ग्वांगशी जवळील डोंगराळ भागात दुर्घटनाग्रस्त झाले. या विमान अपघातात नऊ क्रू मेंबर्ससह एकुण 132 प्रवाशांचा मृत्यू झाला. हा अपघात चीनमध्ये गेल्या तीन दशकांमध्ये झालेला सर्वात मोठा विमान अपघात असल्याचं बोललं जातं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या