एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
युद्धासाठी तयार राहा, चीनच्या राष्ट्रपतींचे लष्कराला आदेश
पीपल्स लिबरेशन आर्मीला 90 वर्ष पूर्ण झाल्याचं निमित्त साधून चीनने उत्तर चीनमध्ये लष्करी सामर्थ्याचं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी 'युद्धासाठी तयार राहा,' असा आदेशच चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी लष्कराला दिला.
मुंबई : पीपल्स लिबरेशन आर्मीला 90 वर्ष पूर्ण झाल्याचं निमित्त साधून चीनने उत्तर चीनमध्ये लष्करी सामर्थ्याचं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी 'युद्धासाठी तयार राहा,' असा आदेशच चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी लष्कराला दिला.
चीनची कम्युनिस्ट पार्टी ज्या दिशेने सांगेल त्या दिशेने कूच करण्यासाठी सैन्याने सदैव सज्ज रहावं. देशावर वक्रदृष्टी ठेवून असणाऱ्यांना विनाश करण्याचं सामर्थ्य चीनच्या लष्करामध्ये आहे यात कुणाचंही दुमत नाही, असं शी जिनपिंग म्हणाले.
जिनपिंग यांनी सैन्याला उद्देशून केलेलं हे भाषण भारताला दिलेला इशारा तर नव्हता ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. कारण गेल्या दोन महिन्यांपासून डोकलाम मुद्द्यावरून भारत आणि चीन समोरासमोर उभे ठाकले आहेत. त्यातच चिनी अधिकारी आणि मीडिया अधूनमधून युद्धाच्या धमक्या देत आहेत. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे नुकतेच चीनच्या दौऱ्यावर जाऊन आले. पण डोकलाम प्रश्नी काहीच तोडगा निघाला नाही.
उत्तर कोरियाच्या कुरापती सुरुच
चीनने उत्तर सीमेवर लष्कराची जमवाजमव सुरू केली आहे. तर तिकडे चिथावणीखोर उत्तर कोरियाच्या कुरापती सुरूच आहेत.
उत्तर कोरियाने सलग दुसऱ्यांदा इंटरकॉन्टिनेन्टल बॅलिस्टिक मिसाईलची चाचणी केली. या चाचणीसाठी उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जॉन यू स्वतः जातीने हजर होते.
संपूर्ण अमेरिका या अत्याधुनिक मिसाईलच्या कक्षेत असल्याचा उत्तर कोरियाचा दावा आहे.
उत्तर कोरियाच्या या चाचणीला उत्तर देण्यासाठी अमेरिकेच्या B-1B या अत्याधुनिक विमानांनी उत्तर कोरियाच्या डोक्यावर घिरट्या घालायला सुरूवात केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची चीनला तंबी
दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरून चीन आणि उत्तर कोरियाला तंबी दिली आहे.
चीनने मोठी निराशा केली आहे. अमेरिकेच्या मदतीमुळे चीनने व्यापाऱ्यात अब्जावधी डॉलर्स कमावले. मात्र आता चीनने आम्हाला पाठ दाखवली. उत्तर कोरियाच्या प्रकरणात चीनने बाता मारण्याशिवाय काहीच केलं नाही. ठरवलं असतं तर चीन या समस्येवर तोडगा काढू शकलं असतं.
हा सगळा घटनाक्रम पाहता जग युद्धाच्या उंबरठ्यावर तर उभं नाही ना, अशी शंकेची पाल चुकचुकणं साहजिक आहे.
संबंधित बातम्या :
भारत-चीन वादाचं नेमकं कारण असलेलं डोकलामचं ‘ए’ टू ‘झेड’
बिजिंगमधील राजदुतांच्या परिषदेत चीनची भारताला धमकी
…तर पाकिस्तानच्या विनंतीवर काश्मीरमध्ये सैन्य घुसवू : चीनी मीडिया
चिनी दूतावासाकडून भारतात येणाऱ्या नागरिकांसाठी ‘ट्रॅव्हल अलर्ट’ जारी
G-20 : मोदी आणि शी जिनपिंग यांची भेट, डोकलाम प्रश्नावरही चर्चा : सूत्र
चीनच्या ‘ड्रॅगन’वर भारताच्या ‘रुक्मिणी’ची नजर
सिक्कीममधून भारताने सैन्य हटवावं, चीनच्या उलट्या बोंबा
…अन्यथा 1962 पेक्षा गंभीर परिणाम भोगावे लागतील, चिनी मीडियाची पुन्हा धमकी
हिंदी महासागरात चीनच्या कुरापती, युद्धनौका तैनात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
करमणूक
करमणूक
Advertisement