Bangladesh : हिजाब न घातल्यामुळे महिलांवर हल्ले, टवाळखोरांच्या झुंडी माजल्या; उस्मान हादीच्या हत्येनंतर बांग्लादेशची परिस्थिती हाताबाहेर
Bangladesh Violence Against Women : हिजाब न घातल्यामुळे आणि पाश्चिमात्य पोशाख परिधान केल्यामुळे बांग्लादेशमध्ये महिलांवर हल्ले होत आहेत. महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे होत आहेत.

मुंबई : बांग्लादेशचा युवा नेता शरीफ उस्मान हादी (Osman Hadi) याच्या हत्येनंतर देशभरात अस्थिरतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर हिजाब किंवा बुरखा न घातल्यामुळे महिलांवर हल्ले झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे बांग्लादेशमध्ये महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
व्हायरल व्हिडीओंमुळे खळबळ (Viral Videos Bangladesh)
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होणाऱ्या दोन व्हिडीओंमध्ये महिलांना झालेल्या अमानुष मारहाणीचे दृश्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. पाश्चिमात्य कपडे परिधान केल्यामुळे आणि हिजाब न घातल्यामुळे एका ख्रिश्चन महिलेला जमावाने मारहाण केली असा दावा एका पोस्टमध्ये करण्यात आला आहे. तर दुसऱ्या व्हायरल पोस्टमध्ये, दोन मुस्लिम महिलांवर बुरखा किंवा हिजाब न घातल्याच्या कारणावरून हल्ला करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या दाव्यांसोबतच, उस्मान हादीच्या मृत्यूनंतर बांग्लादेशमधील परिस्थिती अधिक बिघडत असल्याचं चित्र आहे.
This is so shameful and disgusting📌
— Mariana Times (@timeswmariana) December 18, 2025
A Christian Woman in Bangladesh is assaulted by a pack of rabid savages after they spot her not wearing Burqa/Hijab, wearing Western Clothes. These monsters will never assimilate into our society. pic.twitter.com/rZH4oLBmxO
महत्त्वाचे म्हणजे, या विशिष्ट घटनांबाबत बांग्लादेश सरकार किंवा सुरक्षा यंत्रणांकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी देण्यात आलेली नाही. मात्र, हे व्हिडीओ आणि पोस्ट्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने महिलांची सुरक्षितता, धार्मिक स्वातंत्र्य आणि सामुदायिक तणाव या मुद्द्यांवर तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
2 Muslim girls were attacked by Muslims in Bangladesh for not wearing Burqa & Hijabpic.twitter.com/4gYCh8dc2k
— Kreately.in (@KreatelyMedia) December 19, 2025
उस्मान हादीच्या मृत्यूनंतर तणाव वाढला (Osman Hadi Killing Impact)
बांग्लादेशमध्ये शरीफ उस्मान हादी, हा युवा नेता आणि Inqilab Mancha या संघटनेचा प्रमुख होता. तो 2024 साली झालेल्या ढाकामधील विद्यार्थी आंदोलनाशी (Student Uprising Movement) संबंधित होता. 12 डिसेंबर रोजी ढाक्यात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्यानंतर त्याला गंभीर अवस्थेत सिंगापूरमध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
उस्मान हादी याच्या मृत्यूनंतर ढाका आणि इतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं, हिंसाचार आणि तोडफोड पाहायला मिळाली. आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष झाले, तर काही ठिकाणी मीडिया कार्यालये आणि राजकीय आस्थापनांवरही हल्ले झाले.
अंतरिम सरकारचा इशारा, शोधमोहीम सुरू
बांग्लादेशच्या अंतरिम सरकारने उस्मान हादी याची हत्या 'पूर्वनियोजित कट' असल्याचे सांगत, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम (Manhunt) सुरू केली आहे. या हत्येप्रकरणी माहिती देणाऱ्यास रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
दरम्यान, महिलांवर कथित हल्ल्यांचे व्हायरल दावे समोर आल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अनेक भागांमध्ये पोलीस आणि अर्धसैनिक दल तैनात करण्यात आले असले, तरी काही प्रदेशांमध्ये परिस्थिती अजूनही तणावपूर्ण असल्याचे सांगितले जात आहे.
सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया कधी?
हिजाब किंवा धार्मिक ओळखीवरून महिलांवर हल्ले झाल्याच्या दाव्यांबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. दरम्यान, मानवाधिकार संघटना आणि नागरिकांकडून संयम, जबाबदारी निश्चित करण्याची मागणी आणि सामान्य नागरिकांच्या संरक्षणासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली जात आहे.
ही बातमी वाचा:























