एक्स्प्लोर

Bangladesh : बांग्लादेशमध्ये जमावाच्या हिंसेचा बळी ठरलेला हिंदू युवक कोण होता? ईशनिंदा आरोपाखाली अमानुष हत्या; प्रकरणात आतापर्यंत काय कारवाई?

Bangladesh Dipu Das Lynching : ईशनिंदेचा आरोप करत बांग्लादेशमध्ये टोळक्याने दिपू दास या हिंदू तरुणाची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह महामार्गावर टाकून त्याला आग लावल्याची घटना घडली.

ढाका : बांग्लादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसा, जाळपोळ आणि अराजकतेदरम्यान हिंदू युवक दीपू चंद्र दास (Dipu Das) याच्या निर्घृण हत्येने संपूर्ण जगाच लक्ष वेधल आहे. ईशनिंदेच्या आरोपाखाली (Blasphemy Violence) जमावाने दीपू दास याला मारहाण करून ठार केलं आणि नंतर मृतदेह जाळल्याची घटना घडली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेनंतर बांग्लादेशातील अल्पसंख्याक समदायात संतापाची लाट उसळली असून, भारतातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Who was Dipu Das : दीपू दास कोण होत?

25 वर्षीय दीपू चंद्र दास ह बांग्लादेशातील मैमनसिंह शहरात वास्तव्यास होत. त अल्पसंख्याक हिंदू समुदायातून येत होत आणि अत्यंत गरीब कुटुंबातील होत. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त स्क्वेअर मास्टरबारी परिसरातील ‘पायनियर निट कम्पोझिट’ या वस्त्रोद्योग कारखान्यात काम करत होत. दीपू ह त्याच्या कुटुंबातील एकमेव कमावत सदस्य होत.

Bangladesh Blasphemy Violence : ईशनिंदेचा आरोप आणि जमावाचा हल्ला

गुरुवारी कारखान्याच्या परिसरात आणि आसपास मोठ्या प्रमाणावर जमाव जमला होता. याचवेळी ईशनिंदेचा आरोप करत जमावाने दीपू दासवर अचानक हल्ला केला. त्याला निर्दयपणे मारहाण करण्यात आली आणि या हल्ल्यातच दीपू दासचा जागीच मृत्यू झाला.

Bangladesh Violence : मृतदेहाला आग लावून अमानुष कृत्य

भालुका मॉडेल पोलीस ठाण्याचे निरीक्षक अब्दुल मालेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या केल्यानंतर जमावाने दीपू दासचा मृतदेह ढाकामैमनसिंह महामार्गावर टाकून त्याला आग लावली. दीपू दासचे वडील रविलाल दास यांनी सांगितले की, त्यांना आपल्या मुलाच्या हत्येबद्दलची माहिती सोशल मीडियावरून मिळाली.

“माझ्या मुलाला आधी बेदम मारहाण करण्यात आली, नंतर झाडाला बांधले आणि त्याच्यावर रॉकेल ओतून आग लावण्यात आली. त्याचा अर्धवट जळालेला मृतदेह रस्त्यावर टाकून दिला होता. हे दृश्य आमच्यासाठी असह्य आहे,” अशी वेदनादायी प्रतिक्रिया रविलाल दास यांनी दिली.

Dipu Das Murder : प्रकरणात आतापर्यंत 7 जणांना अटक

दीपू दास मॉब लिंचिंग प्रकरणात रॅपिड अ‍ॅक्शन बटालियनने (RAB) आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. बांग्लादेश सरकारने वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले आहे. बांग्लादेशच्या युनूस सरकारने या हत्येचा तीव्र निषेध करत, नव्या बांग्लादेशमध्ये हिंसेला कोणतीही जागा नाही असे स्पष्ट केल. मात्र, दीपू दासच्या वडिलांनी सरकारकडून अद्याप कोणतेही थेट आश्वासन न मिळाल्याची खंत व्यक्त केली आहे.

Bangladesh News : मानवाधिकार कार्यकर्त्यांचा संताप

निर्वासित बांग्लादेशी लेखिका आणि मानवाधिकार कार्यकर्त्या तस्लिमा नसरीन यांनी दीपू दासच्या हत्येवर तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, दीपू यांच्यावर ईशनिंदेचा खोटा आरोप लावण्यात आला होता. एका क्षुल्लक वादातून एका सहकाऱ्याने त्यांच्यावर आरोप केल्याने जमाव हिंसक झाला आणि त्यात दीपूचा बळी गेला.

“दीपू दास हा गरीब मजूर होता. तो आपल्या अपंग वडील, आई, पत्नी आणि मुलाचा उदरनिर्वाह करत होता. त्याची हत्या म्हणजे केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नाही, तर संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त होणे आहे,” असे तस्लिमा नसरीन यांनी म्हटलं.

भारतामधूनही तीव्र प्रतिक्रिया

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी या घटनेला मानवतेविरोधातील गुन्हा आणि सभ्य समाजावरचा डाग असे संबोधले आहे. भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
Colombia Earthquake : कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget