(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Animal Trafficking : बँकॉक विमानतळावर दोन भारतीय महिलांना अटक, बँगेत सापडले 109 जिवंत प्राणी
Animal Trafficking : थायलंडच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निथ्या राजा आणि जकिया सुल्ताना या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. या महिला चेन्नईच्या (Chennai) विमानाने रवाना होणार होत्या.
Animal Trafficking : थायलंड (Thailand) च्या अधिकाऱ्यांनी सोमवारी बँकॉकमधील (Bangkok) सुवर्णभूमी विमानतळावर (Suvarnabhumi Airport) दोन भारतीय महिलांना (Indian Women) अटक केली आहे. या महिला प्राण्यांची तस्करी करण्याच्या प्रयत्नात होत्या. त्यांच्या बॅगेत 109 जिवंत प्राणी सापडले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, थायलँडच्या राष्ट्रीय उद्यान, वन्यजीव आणि वनस्पती संवर्धन विभागाने माहिती दिली आहे की, एक्स-रे तपासणीनंतर (X-Ray Inspection) दोन सुटकेसमध्ये प्राणी सापडले. या बॅगेत दोन पांढरे साळिंदर (Porcupines), दोन खवले मांजर (Armadillos), 35 कासवं (Turtles), 50 सरडे (Lizards) आणि 20 साप (Snakes) आढळले आहेत.
थायलंडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्राणी सापडेल्या सुटकेस नित्या राजा आणि झाकिया सुलताना इब्राहिम या दोन भारतीय महिलांच्या आहेत. त्या चेन्नईला जाणाऱ्या विमानात बसणार होत्या.
दोन्ही महिलांना अटक
या दोन्ही महिलांना 2019 च्या वन्यजीव संरक्षण आणि संरक्षण कायदा, 2015 चा प्राणी रोग कायदा आणि 2017 च्या सीमाशुल्क कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.
प्राण्यांची तस्करी ही मोठी समस्या
सीएनएनच्या रिपोर्टनुसार, विमानतळांवरून प्राण्यांची तस्करी ही फार पूर्वीपासून एक समस्या आहे. 2019 मध्ये, बँकॉकहून चेन्नईला जाणार्या एका माणसाच्या सामानात एक महिन्याचे बिबट्याचे पिल्लू आढळले होते, त्यावेळी त्याला विमानतळावर ताब्यात घेण्यात आले होते.
गेल्या महिन्यात चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी थायलंडमधून वन्य प्राण्यांची तस्करी करण्याचे दोन प्रयत्न हाणून पाडले आहेत. पीटीआयनुसार, बँकॉकहून चेन्नईला आलेल्या एका प्रवाशाकडून दोन जिवंत प्राणी जप्त केले.
वन्यजीव व्यापार निरीक्षण एजन्सी TRAFFIC च्या 2022 च्या अहवालात सांगण्यात आलं आहे की, 2011 ते 2020 दरम्यान, 18 भारतीय विमानतळांवर 70,000 पेक्षा अधिक देशी आणि विदेशी वन्य प्राणी सापडले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या