सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण
अर्चना पूरण सिंगला कॉमेडी सर्कससाठी हसण्याचे शॉट्स कसे द्यावे लागले याबद्दल तिनं नुकतंच एका मुलाखतीत सांगितलंय. या मुलाखतीची क्लिप सध्या समाजमाध्यमावर जोरदार व्हायरल होत आहे.
Archana Pooran Singh: समोरच्याला हसवणं ही सोपी गोष्ट नाही. पण समोरच्याला त्याच्या छोट्या छोट्या शाब्दीक कोट्यांसाठी दाद देणंही तितकंच अवघड. द कपिल शर्मा शो, कॉमेडी नाईट्स विथ कपिल आणि आता द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो यासारख्या रिॲलिटी शोमध्ये हास्याचा खळखळाट करणारी बॉलिवूड अभिनेत्री अर्चना पूरण सिंगनं नुकताच तिच्या एका मनोरंजनसृष्टीतल्या भावनिक प्रसंगाविषयीची आठवण सांगितली आहे. शोमध्ये सासूच्या निधनाची बातमी कळल्यानंतरही तिला जबरदस्ती हसावं लागल्याचं तिनं एका शोमध्ये बोलताना सांगितलंय.
अर्चना पूरण सिंगला कॉमेडी सर्कससाठी हसण्याचे शॉट्स कसे द्यावे लागले याबद्दल तिनं नुकतंच एका मुलाखतीत सांगितलंय. या मुलाखतीची क्लिप सध्या समाजमाध्यमावर जोरदार व्हायरल होत आहे.
सेटवरच कळली सासूच्या मृत्यूची बातमी
कॉमेडी सर्कसच्या सेटवर सासूच्या मृत्यूची बातमी अर्चना पूरण सिंग यांना कळल्याचं अर्चना म्हणाल्या. आणि तरीसुद्धा त्यांना कॉमेडी सर्कससाठी हसण्याचे शॉट्स द्यावे लागल्याचं अर्चना यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, मी माझ्या सासूच्या खूप जवळ होते. आम्ही एक एपीसोड बऱ्यापैकी पूर्ण केला होता. जो थोडा बाकी होता तो भाग शुट करण्यासाठी आम्ही सेटवर होतो. तेंव्हाच मला सासूच्या मृत्यूची बातमी कळली. मी सांगितलं मला जावं लागेल. अंगावर शहारे आले होते. माझ्या डोक्यात सतत तोच विचार सुरु होता. पण दुसऱ्याबाजूला एपिसोडही पूर्ण करायचा होता. मग त्यात ते म्हणाले, तुम्ही लाफ्टर शॉट्स द्या, आम्हाला जिथे लागतील तिथे ते आम्ही नंतर वापरू. आयुष्यात पहिल्यांदा अशा परिस्थितीत मी तिथे बसून सगळ्या हसण्याच्या प्रतिक्रीया दिल्या. काम अर्धवट सोडता येणार नाही . जेंव्हा ३०- ४० वर्ष तुम्ही एखाद्या व्यवसायात घालवता तेंव्हा तुम्हाला माहित असतं उत्पादकांचा पैसा यामध्ये गुंतवलेला असतो. त्यामुळे तुम्ही काम अर्धवट टाकू शकत नाही.
View this post on Instagram
असं कोणाचं नशीब असेल...
या घटनेनंतर आधी नवऱ्याला फोन केला. त्याला या घटनेतून भानावर यायला काही मिनीटं गेली. मला काहीच कळत नव्हते. डोळ्यांसमोर अंधार झाल्यासारखे वाटत होते. पण तो एपीसोड पूर्ण करण्यासाठी मी गेले. ॲक्शन म्हणताच मी हसले.. हसले आणि हसले. मला वाटत नाही असं कोणाचं नशीब असेल ज्याला ही बातमी कळल्यावर जबरदस्ती हसावं लागलं असेल, असं अर्चना पूरण सिंग यांनी सांगितलं.
हेही वाचा: