एक्स्प्लोर

Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात होणार महत्त्वाचा बदल, 'त्या' लोकल ट्रेन CSMT नव्हे तर दादर स्थानकातून सुटणार

Mumbai Railway: मुंबईतील लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल. फास्ट ट्रेन आता सीएसएमटी नव्हे तर दादर स्थानकातून सुटणार. मुंबईकरांना मोठा दिलासा.

मुंबई: घड्याळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन सेवा ही  शहराची लाईफलाईन मानली जाते. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेमार्गाने दररोज लाखो प्रवासी ये-जा करतात. यापैकी मध्य रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेनच्या (Mumbai Local Trains) वेळापत्रकात आता महत्त्वाचे बदल होणार आहेत. येत्या 5 ऑक्टोबरपासून हे नवे बदल लागू होणार आहेत. त्यानुसार आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकातून सोडल्या जाणाऱ्या 20 फास्ट लोकल ट्रेनचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. 

या लोकल ट्रेन आता CSMT स्थानकातून न सुटता दादर स्थानकातून सुटणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात रेल्वे फलाटांची संख्या मर्यादित आहे.  त्यामुळे अनेकदा फास्ट लोकल वेटिंगवर असतात आणि ट्रेन सुटायला उशीर होतो. परिणामी या लोकल गाड्यांचे पुढील वेळापत्रक बिघडते आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे मध्य रेल्वेने 20 जलद मार्गावरील लोकल ट्रेन आता दादर स्थानकातून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दादर स्थानकात कायम प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे येथूनच फास्ट लोकल सुटल्यास प्रवाशांना मोठा फायदा होऊ शकतो. तसेच ठरलेल्या वेळेत या लोकल गाड्यांनी स्थानक सोडल्यास पुढील प्रवासही नियोजित वेळेत शक्य होईल. या निर्णयामुळे सीएसएमटी स्थानकातील गर्दीही कमी होण्यास मदत होईल.

दर अडीच मिनिटांनी लोकल ट्रेन सुटणार

मुंबईतील लोकल प्रवास सुखकारक करण्यासाठी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेमार्गावर कम्बाईन कम्युनिकेशन्स बेस्ड कंट्रोल ट्रेन  कंट्रोल (सीबीटीसी) यंत्रणा वापरण्यात येणार आहे.  त्यामुळे दोन लोकलमधील वेळेचे अंतर 180 सेकंदांवरुन 150 सेकंदांपर्यंत (अडीच मिनिटे) कमी होणार आहे. त्यामुळे मुंबईतील तिन्ही रेल्वेमार्गांवरील गाड्यांना होणारा उशीर टळणार आहे.

वेस्टर्न रेल्वेमार्गावर 150 लोकल रद्द होणार

पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेनच्या तब्बल 150 फेऱ्या रद्द होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर सध्या मालाड स्थानकापर्यंत सहाव्या मार्गिकेच्या विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. मात्र, हे काम नियोजित वेळेत पूर्ण न झाल्यामुळे 4 ऑक्टोबरपर्यंत या मार्गावरील लोकल गाड्यांच्या 150  फेऱ्या रद्द झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे.

आणखी वाचा

लोकल अन् रेल्वेतून प्रवास विनातिकीट करणाऱ्यांवर मध्य रेल्वे सर्जिकल स्ट्राईक करणार, रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवणार?

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, दर अडीच मिनिटांनी लोकल ट्रेन, सीबीटीसी यंत्रणेमुळे मोठा दिलासा मिळणार

महत्त्वाच्या बातम्या

FDA News : एफडीएच्या आणखी 6 अधिकाऱ्यांचं निलंबन होणार? मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील, कार्यक्षेत्राबाहेर रेड मारणं भोवणार, नेमकं काय आहे प्रकरण?
एफडीएच्या आणखी 6 अधिकाऱ्यांचं निलंबन होणार? मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील, कार्यक्षेत्राबाहेर रेड मारणं भोवणार, नेमकं काय आहे प्रकरण?
Navnath ban and Nilesh Rane: तुझी लायकी किती तू बोलतो किती! नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं: निलेश राणे
तुझी लायकी किती तू बोलतो किती! नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं: निलेश राणे
Mumbai Drone Accident Churchgate station: वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
Mumbai Art Gallery : मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेचे भव्य दालन उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेचे भव्य दालन उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
Washim Farmer Protest: वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
Nivedita Ashok Saraf In Swami Samarth Ardhanarishvara Look: 'स्वामींच्या इच्छेनेच...', निवेदिता सराफ यांनी साकारलं श्री स्वामी समर्थांचं 'अर्धनारीश्वर' रूप, PHOTOs
'स्वामींच्या इच्छेनेच...', निवेदिता सराफ यांनी साकारलं श्री स्वामी समर्थांचं 'अर्धनारीश्वर' रूप, PHOTOs
Pune Crime News: सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
India vs Pakistan : मोठी बातमी : पाकिस्तानी फलंदाजांनी कृणाल पांड्याला धू-धू धुतला, 23 चेंडूत संपवली मॅच; टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी : पाकिस्तानी फलंदाजांनी कृणाल पांड्याला धू-धू धुतला, 23 चेंडूत संपवली मॅच; टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, नेमकं काय घडलं?
Thane Crime news: पोलिसांनी सूर्यफूल तेल लावून लघवीच्या जागेवर मारलं,अंतर्वस्त्र डोक्यात घातली, राम पूर्णेकरांचा गंभीर आरोप, आदित्य ठाकरेंच्या आंदोलनातील तरुणांना ठरवून टार्गेट केल्याचा दावा
पोलिसांनी सूर्यफूल तेल लावून लघवीच्या जागेवर मारलं,अंतर्वस्त्र डोक्यात घातली, राम पूर्णेकरांचा गंभीर आरोप, आदित्य ठाकरेंच्या आंदोलनातील तरुणांना ठरवून टार्गेट केल्याचा दावा
नागपुरात भीषण अपघात! म्हाडाच्या बांधकामस्थळी क्रेन कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, दोघे जखमी
नागपुरात भीषण अपघात! म्हाडाच्या बांधकामस्थळी क्रेन कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, दोघे जखमी
Embed widget