Amazon : मास्कशिवाय काम करण्यास परवानगी पण... ; अॅमेझॉनचे नवे नियम
अॅमेझॉन कंपनीनं (Amazon) गुरूवारी (10 फेब्रुवारी) त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी नवे नियम जाहीर केले आहेत.
Amazon : प्रसिद्ध कंपनी अॅमेझॉन (Amazon) यांनी गुरूवारी (10 फेब्रुवारी) त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी नवे नियम जाहीर केले आहेत. अॅमेझॉनच्या यूएसमधील (United States) वेअरहाऊस आणि लॉजिस्टिक साइट्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जर पेड लिव्ह घ्यायची असेल तर त्यांचे 18 मार्चपर्यंत पूर्णपणे लसीकरण करावे, अशी माहिती अॅमेझॉन कंपनीनं कर्मचाऱ्यांना दिली आहे.
अॅमेझॉननं त्यांच्या या नव्या नियमांबाबतचा निर्णय अमेरिकेमधील कोरोना (COVID-19) रूग्ण संख्या, लसीकरणा करणाऱ्यांची वाढती संख्या, वैद्यकीय तज्ञ आणि सार्वजनिक आरोग्य अधिकारी यांचे मार्गदर्शन या सर्व गोष्टींचा विचार करून घेण्यात आला आहे. तसेच अॅमेझॉननं आजपासून (शुक्रवार) पूर्ण लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांना मास्कशिवाय काम करण्याची परवानगी देखील दिली आहे. अॅमेझॉन कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, 'पुन्हा नोर्मल आयुष्य जगण्यासाठी हे सकारात्मक नियम तयार करण्यात आले आहे.'
कंपनीकडून कोरोना सुरक्षा विषयक नियम पाळले जात नव्हते त्यामुळे कंपनीतील कर्मचारी नाराज होते आणि त्यांनी कंपनीवर टीका करण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर कंपनीनं या नव्या नियमांबाबत विचार करण्यास सुरूवात केली. लसीकरण न झालेला कर्मचारी निवासस्थानाशिवाय एक आठवडा कोविड आयसोलेशनसाठी विना वेतन सुट्टी घेऊ शकतो, असे कंपनीनं जाहीर केलेल्या नव्या नियमांमध्ये म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- COVID 19 new Variants: अजूनही काळजी घेणं गरजेचं, कोरोना व्हायरसला घेऊन WHO चं मोठं विधान, म्हणाले...
- mRNA vaccine : पुण्यात तयार झाली भारताची पहिली मेसेंजर आरएनए कोरोना लस
- Novavax : 12 ते 17 वयोगटातील मुलंसाठी नोव्हावॅक्स लस 80 टक्के प्रभावी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha